जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत
यश गाबनंग प्रथम
रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्यावतीने देवरूख येथील एसव्हीजेटी क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हा क्रीडा जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण केंद्रातील दोन खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या गटात सहभाग घेतला होता. त्यात यश गाबनंग याने १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला, तर उत्कृष्ट अनिल खापरे याने १४ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी प्रशिक्षक सचिन मांडवकर यांनी सांभाळली. या स्पर्धेत रत्नागिरी, चिपळूण व संगमेश्वर या तालुक्यांतील पोदार इंटरनॅशनल स्कूल, पी. एस. बी. इंटरनॅशनल स्कूल, संगमेश्वर, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, डेरवण, सर्वंकष विद्यामंदिर व खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल, गोवळकोट या शाळांनी सहभाग नोंदवला.
--------
स्वामित्व योजनेंतर्गत
सनद वाटप
रत्नागिरी : स्वामित्व गावठाण भूमापन योजनेंतर्गत मंडणगड व रत्नागिरी तालुक्यांमध्ये गावकऱ्यांना सनद वाटप केली आहे. मंडणगड तालुक्यात उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांच्यामार्फत जुलै २०२५ मध्ये लोकरवण, उमरोली, राजवली, जावळे, आसावळे, तुळशी, कळकवणे, धामणी, गुढेघर या गावांमध्ये ५६० सनद वाटप करण्यात आले. सनद शुल्क म्हणून २ लाख ५८ हजार रुपये इतकी रक्कम जमा केली आहे. भूमी अभिलेख उपअधीक्षकांमार्फत रत्नागिरी तालुक्यातील पानवल व रनपार या गावांमध्ये १०६ सनद वाटप करून १ लाख १० हजार ९७५ रुपये सनद शुल्क वसूल करण्यात आले आहे.
------
दहीहंडीनिमित्त
देवरूखमध्ये कार्यक्रम
संगमेश्वर ः महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टच्या संगमेश्वर तालुक्यातर्फे भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व भव्य हंडी सोहळ्याचे देवरूख येथे माटे भोजने सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी भगवान श्रीकृष्णाची विधीवत पूजा, भगवद्गीता पठण, प्रवचन, हरिपाठ व सुश्राव्य भजन, रात्री ८ ते १२ श्रीकृष्ण जीवनावरील गीतांवर आधारित रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रात्री १२ वाजता जन्मोत्सव व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. त्यानंतर दूध व खिचडीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. शनिवारी (ता. १६) दुपारी ४ वाजता दहीहंडी गोपाळकाला आयोजित करण्यात आला आहे. या वेळी सर्वांनी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवून प्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती ट्रस्टचे चंद्रकांत भोजने, संतोष केदारी, मुकुंद वाजे, रवींद्र बांडागळे, दिलीप महाडिक, विक्रांत भोजने, संदीप भालेकर, दिनेश बिरवटकर, अतुल बांडागळे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.