कोकण

खारेपाटणला भाजपतर्फे शनिवारी दहीहंडी उत्सव

CD

खारेपाटणला भाजपतर्फे
शनिवारी दहीहंडी उत्सव
तळेरे : भाजप खारेपाटण व उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्यातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून शनिवारी (ता. १६) खारेपाटण एसटी बस स्थानक येथे १ लाख ११ हजार १११ रुपयांच्या बक्षिसासह चषक असलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. आयोजक श्री. गुरव यांनी ही माहिती दिली. दुपारी १ वाजता दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे. मोठी बक्षीस रक्कम असलेली स्पर्धेची दहीहंडी खारेपाटणमध्ये प्रथमच बांधण्यात येणार असून, यात सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगडसह मुंबई व ठाणे येथील गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. या उत्सवात सहभाग घेणाऱ्या गोविंदा पथकांना विविध आकर्षक चषक व रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ३०००, पाच थरांसाठी ४०००, सहा थरांकरिता ५०००, सात थरांसाठी ६००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व सहभागी गोविंदा पथकांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या दहीहंडी उत्सवात जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
........................
केरवडेत मंगळवारी
‘भरत भेट’नाटक
कुडाळ ः केरवडेचे उपसरपंच अर्जुन ऊर्फ आनंद परब यांच्या मातोश्री सुलोचना पुरुषोत्तम परब यांच्या स्मरणार्थ अर्जुन परब मित्रमंडळातर्फे मंगळवारी (ता. १९) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संचात श्रीराम चरित्रावर आधारित बंधुप्रेमाची यशोगाथा प्रगट करणारा ‘भरत भेट’ हा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग श्री देव जगन्नाथ मंदिर केरवडे येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित केला आहे. यात गणपती-मनीष केरवडेकर, रिद्धी सिद्धी-दत्ताराम गोडकर, भरत-दत्तप्रसाद शेणई, इंद्र-सागर गावकर, नारद-चारुहास मांजरेकर, राजा दशरथ-नारायण आसयेकर, कैकयी-बंटी कांबळी, मंथरा -शिवप्रसाद मेस्त्री, कली देव-प्रशांत मयेकर, श्रीराम-गौरव शिर्के, सीता-नीळकंठ सावंत, लक्ष्मण-महेंद्र कुडव, कोळी-संदेश वेंगुर्लेकर, सुमंत प्रधान-उदय मोर्ये, वशिष्ठ-सुयश ठाकूर आदींच्या भूमिका आहेत. संगीत साथ मयुर गवळी (हार्मोनियम), किसन नेमळेकर (मृदंगमणी), तालरक्षक-हरेश नेमळेकर, विनायक सावंत यांची आहे. या नाटकास विशेष सहाय्य तेंडोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचे (झाराप) समीर तेंडोलकर यांची आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसरपंच अर्जुन परब, मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
...................
मालवणात आज
रानभाजी महोत्सव
कुडाळ ः तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालयातर्फे उद्या (ता. १४) भगवती मंगल कार्यालय आनंदव्हाळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळून येणाऱ्या विविध रानभाज्या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. तसेच या रानभाज्यांपासून बनविलेल्या पाककृतींसाठी स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले आहे. या कार्यक्रमात कृषी अधिकारी व रानभाजी अभ्यासकांकडून मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. पाककृती स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या रानभाजी महोत्सवामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी (मालवण) अमोल करंदीकर यांनी केले आहे.
....................
रेल्वे संघर्ष समितीची
कार्यकारिणी जाहीर
ओरोस ः कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समिती सिंधुदुर्गच्या सिंधुदुर्ग स्थानकाची नूतन कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष परशुराम परब, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा सचिव अजय मयेकर, जिल्हा सहसचिव साई आंबेरकर, जिल्हा खजिनदार स्वप्नील गावडे आदींसह जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीमध्ये उपाध्यक्ष पांडुरंग मालवणकर, प्रणाली अवसरे, सुभाष लाड, लता खोत, सहसचिव विशाल मसुरकर, राहुल शिर्के, कार्याध्यक्ष सुनील पाताडे, खजिनदार सुशील निब्रे, सहसचिव सुशील गावडे, प्रसिद्धीप्रमुख मंदार पडवळ, सल्लागार बापू वायंगणकर, उदय दळवी, श्रीकृष्ण भोगवेकर, भाई राणे, सुहास भोजने, सुप्रिया वालावलकर, कार्यकारिणी सदस्य दादा गावडे आदींची निवड केल्याचे जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 'सातारा जिल्ह्यातील आशिष महांगरे बनला संशाेधक'; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी, जर्मनीत करणार संशोधन

Pune : जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर; मित्रासह दोघांना अटक

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT