कोकण

हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे मळगावात उद्या उद्घाटन

CD

हिंदवी स्वराज्य
ध्वजस्तंभ उद्घाटन
सावंतवाडीः श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मळगाव येथे ५० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे उद्घाटन मंगळवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता होणार आहे. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ, मळगाव ग्रामस्थ यांनी याचे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व ग्रामस्थ, धारकरी आणि हिंदूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या ध्वजस्तंभामुळे मळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे, अशी भावना पांडुरंग राऊळ यांनी व्यक्त केली.
..................
‘मेंदूचा खुराक’
रविवारी कार्यशाळा
कणकवलीः गोपुरी जीवन शिक्षण शाळेच्या वतीने रविवारी (ता. १७) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ‘मेंदूचा खुराक’ कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत दुसरी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. यावेळी अनुवादक, लेखक सुनील तांबे मार्गदर्शन करणार आहेत. एकाग्रता कार्यकारण भाव आणि प्रश्न सोडविण्याचा वेग वाढेल, अशी कोडी व खेळ यावरही भर देण्यात येणार आहे. वागदे येथील नाईक पेट्रोलपंपामागील गोपुरी आश्रमाच्या गणपतराव सावंत बहुद्देशीय सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. अधिक माहितीसाठी सदाशिव राणे, विनायक सापळे, संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर यांच्याशी संपर्क साधावा.
..........
कणकवलीत २४ ला
सांस्कृतिक कार्यक्रम
कणकवलीः श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ कणकवली यांच्या वतीने २४ ऑगस्टला कणकवली गणपती साना रोडवरील चौंडेश्वरी मंदिर हॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने २४ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता कीर्तन, ६ वाजता अभिषेक, ७ वाजता कथा, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, ८.३० वाजता महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
......................
‘भडगाव बुद्रुक मोबाईल
टॉवर कार्यान्वित करा’
कडावलः भडगाव बुद्रुक येथे बीएसएनएल कंपनीने मोबाईल टॉवर उभारून सात वर्षे झाली तरी अद्याप कार्यान्वित न केल्याने गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. भडगाव येथे बीएसएनएल टॉवर उभारण्यासाठी ३ फेब्रुवारी २०१८ ला ग्रामपंचायतीकडे जमिनीची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने जमीन उपलब्ध करून दिली. टॉवरही उभारला गेला; मात्र अद्याप नेटवर्क सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. भडगाव बुद्रुक व भडगाव खुर्द या गावांत कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज मिळत नसून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रेंज नसल्यामुळे कुठेही संपर्क होत नाही. ग्रामपंचायतीची ऑनलाईन कामे रखडली असून ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत बीएसएनएल कंपनीशी वारंवार निवेदनाद्वारे वा तोंडी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. भडगाव सरपंच गुणाजी लोट व उपसरपंच राजेंद्र राणे यांनी पालकमंत्री नीतेश राणे व कुडाळचे आमदार नीलेश राणे यांची भेट घेऊन मोबाईल टॉवर त्वरित सुरू करण्याविषयी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
.....................
कांदळगावला रविवारी
वाचनालयाची सभा
मालवणः कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची सभा रविवारी (ता. १७) सकाळी १० वाजता वाचनालयात आयोजित केली आहे. नवीन कार्यकारी मंडळाच्या निवडीसह अन्य विषयांवर चर्चा होणार असून सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

India Ultimatum Pakistan: ‘..तर परिणाम वाईट असतील' ; चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा अल्टिमेट!

Manoj Jarange Patil: जरांगे-सरनाईक भेटीत काय चर्चा झाली? मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार? स्पष्ट सांगितलं

Manchar News : साकारमाच-आहुपे गाव पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Supreme Court: मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख लोकांचे नावं जाहीर करा! सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT