कोकण

गौरवगान

CD

भारताचे गौरवगान
स्पर्धा जल्लोषात
रत्नागिरी ः भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले आणि हे वैभवशाली स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिले याचे भान प्रत्येक पिढीला आणि आजच्या शालेय विद्यार्थ्याला असणे गरजेचे आहे. या निमित्ताने नवनिर्माण शाळेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १२ ऑगस्ट रोजी आंतरशालेय देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. प्राथमिक गट पहिली ते पाचवी आणि माध्यमिक गट सहावी ते ९वी. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव प्रमुख उद्‍घाटक म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी देशभक्ती म्हणजे काय, याची माहिती देताना शाळेने अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करावे असा संदेश दिला. या समारंभासाठी कोस्टगार्डच्या पूनम थापा जुनगरे (एअर ट्रॅफिक कंट्रोलर) उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये नऊ शाळांचा सहभाग होता. प्राथमिक गटात प्रथम पारितोषिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय पारितोषिक जगद्गुरू नरेंद्राचार्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, तृतीय पारितोषिक नवनिर्माण हाय आणि उत्तेजनार्थ माने इंटरनॅशनल स्कूलला मिळाले तसेच माध्यमिक गटात माने इंटरनॅशनल स्कूल प्रथम पारितोषिक, फाटक हायस्कूल द्वितीय पारितोषिक, शिर्के गुरूकुल तृतीय क्रमांक आणि नवनिर्माणला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
---
तात्पुरती कंट्रोल
केबिन धोकादायक
साखरपा ः साखरपा एसटी स्थानकातील तात्पुरती उभारण्यात आलेली कंट्रोल केबिन अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या केबिनमध्ये मोठ्या विद्युतदाबाचे मीटर आणि अन्य उपकरणे बसवण्यात आली आहेत. पत्र्याची ही केबिन त्यामुळे धोकादायक ठरत आहे. साखरपा एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे जुन्या इमारतीतील कंट्रोल केबिन वापरात नाही. सध्या हे कार्यालय तात्पुरत्या केबिनमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे; पण ही शेड अत्यंत धोकादायक ठरत आहे. या शेडमध्ये इलेक्ट्रिकचे सगळे मीटर आणि बटणे बसवण्यात आली असली तरी ती सगळी विद्युत उपकारणे उच्च विद्युतदाबाची आहेत. यामध्ये थ्री फेज वायरिंगचीही जोडणी आहे. मुळातच ही केबिन पत्र्याची असल्यामुळे तिच्यात अशी उच्चदाबाची उपकरणे बसवणे धोकादायक आहे. यामुळे या केबिनमध्ये शॉर्टसर्किट होण्याचे किरकोळ प्रकार झाले आहेत. याविषयी देवरूख आगारात सांगूनही त्या विषयी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मोठा अपघात झाल्यावरच महामंडळाला जाग येणार का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 12: नो हँडशेक ड्रामा! हरियाना स्टीलर्सने हास्तांदोलन टाळण्यावेळी काय झालं होतं? दबंग दिल्लीचा कर्णधार म्हणतोय...

MLA Rohit Pawar : सरकार झोपेत असेल तर... मग आम्ही गप्प बसणार नाही; शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही

Latest Marathi News Live Update: राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

Dasara Festival: आपट्याच्या झाडाचं नेमकं महत्त्व काय? पानं दसऱ्याला सोनं म्हणून का वाटतात?

Electricity Shock : विजेच्या शॉक लागुन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील चिंचखेडा (बुद्रुक) येथील घटना

SCROLL FOR NEXT