कोकण

‘सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करा’

CD

‘सावित्रीबाई फुले आधार
योजनेसाठी अर्ज करा’
सावंतवाडी, ता. १६ ः विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाज वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी अशा योजनेचा लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे आंबोली मंडलचे रवींद्र मडगावकर यांनी केले. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना २०२५-२६ साठी विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील बीए, बीकॉम, बी.एस्सी. अशा १२ वीनंतरच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या पदवी, एम.ए., एम. एस्सी. असे पदव्युत्तर अभ्याक्रमात येणाऱ्या विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पद्धतीने १ ते १७ ऑगस्टपर्यंत अर्ज संकेतस्थळावर द्यावा. अर्जाची प्रत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT