कोकण

जगबुडी, नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

CD

-rat१६p३६.jpg-
P२५N८४८०१
खेड ः मच्छीमार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी आले आहे.
-----
‘जगबुडी, नारिंगी’नी धोक्याची पातळी ओलांडली
खेड तालुक्यात मुसळधार : व्यापारी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १६ : तालुक्यात शुक्रवारपासून (ता. १५) पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड पालिकेने बाजारपेठेतील व नदीलगतच्या नागरीवस्तीतील शहरवासीयांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
खेड तालुक्यात दिवसभरात १९०.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गोकुळाष्टमी असूनही खेड बाजारपेठेत गर्दी नव्हती. शनिवारीही (ता. १६) सकाळपासून पाऊस सुरू आहे. खेड मच्छीमार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे भोस्ते पुलाकडून खेड बंदराकडे जाणारा रस्ता सुरक्षिततेच्या कारणामुळे खेड पोलिसांनी बंद केला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांची दमछाक होत असून खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहने चालवताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहनचालक देखील हैराण झाले आहेत.
दरम्यान, पावसामुळे जगबुडी, नारिंगी नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पुराची शक्यता वर्तवली जात आहे.
---
चौकट
तालुक्यात पडलेला पाऊस
खेड - ५८ मिलिमीटर
भरणे- ५६ मि.मी.
शिर्शी - १५७ मि.मी.
आंबवली - १०९ मि.मी.
लवेल- १६३ मि.मी.
कुळवंडी - १३४ मि.मी.
धामणंद - ९० मि.मी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT