कोकण

लांजा-कोत्रेवाडी ग्रामस्थांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू

CD

84805

कोत्रेवाडी ग्रामस्थांचे उपोषण अद्यापही सुरू
डम्पिंग ग्राउंड रद्दच करण्याची मागणी; शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनास पाठींबा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १७ः कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड रद्द किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यासंदर्भात नगरविकास मंत्रालयाकडून कार्यवाही होत नाही तोपर्यंत कोत्रेवाडी येथील प्रस्तावित जागेत कचरा टाकण्याबाबत कार्यवाही होणार नाही असे पत्र आम्हाला द्या, अशी मागणी कोत्रेवाडी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी लांजा मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे केली. मात्र तसे पत्र देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवल्याने डंपिंग ग्राउंड हटवण्यासंदर्भात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले आपले उपोषण अद्यापही चालूच ठेवले आहे.
गुरूवारनंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू असताना लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली; मात्र सायंकाळी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी ग्रामस्थांची भेट घेतली होती. ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंड रद्द करण्याबाबत केलेल्या मागणीबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस उत्तर न दिल्याने कोत्रेवाडी ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले नाही. तत्पूर्वी सकाळ सत्रात ग्रामस्थांनी उपोषण गाजवले. माकडा माकडा हुप हुप, ओसाड जमिनीतलं खाल्लस तूप, अधिकारी बसलेत खुर्चीवर जनता रडते रस्त्यावर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांचा धिक्कार असो, अशा विविध घोषणा देत स्वातंत्र्यदिनी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी लांजा तहसील परिसर दणाणून सोडला.
शनिवारी सायंकाळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी कोत्रेवाडी ग्रामस्थांची भेट घेतली होती.; मात्र अपेक्षित उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थ आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.या उपोषणाला शिवसेना ठाकरे गट यांनी पाठिंबा दर्शवला असून, त्यांचे कार्यकर्तेसुद्धा या उपोषणास सहभागी झाले होते.

चौकट
उपोषण- संघर्षाचा लढा
ग्रामस्थ अद्याप उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत प्रशासन आम्हाला डम्पिंग ग्राउंड रद्द होण्याबाबत किंवा स्थगिती मिळण्याबाबत कोणतेही प्रकारचे ठोस लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत या विरोधातील आपले उपोषण आणि संघर्षाचा लढा हा कायम असाच चालू ठेवण्याचा निर्धार कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT