कोकण

मायनाक भंडारींचे शौर्य अतुलनीय

CD

84974

मायनाक भंडारींचे शौर्य अतुलनीय

पालकमंत्री नीतेश राणे ः सिंधुदुर्गनगरीत सभागृहाचा उद्‍घाटन सोहळा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून मायनाक भंडारी यांचे नाव इतिहासात नोंदवले आहे. त्यांनी अनेक पराक्रम घडवले आहेत. त्यांचे हे कार्य आणि त्यांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृहाचे उद्‍घाटन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार दीपक केस‍रकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच मायनाक भंडारी यांचे वारस उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘मायनाक भंडारी यांचे शौर्य अतुलनीय आहे. या सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या पराक्रमाचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. छत्रपती शिवरायांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ म्हणून ओळखले जाते. त्यांना हे नाव मिळवून देण्यामध्ये मायनाक भंडारींसारख्या असंख्य मावळ्यांचे, सहकाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. मायनाक भंडारी यांचे एकंदरीत कार्य आणि त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जो इतिहास घडवला, मान मिळविला, तो पाहून त्यांचा पूर्ण इतिहास भावी पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम माझ्यासारख्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी केलेच पाहिजे, असे वाटले. म्हणून या सभागृहाला त्यांचे नाव दिले. जेव्हा या सभागृहाचे नाव घेतले जाईल, तेव्हा मायनाक भंडारींची आठवण, त्यांचा इतिहास आणि त्यांचा उल्लेख प्रत्येकाच्या तोंडी आलाच पाहिजे, ही भूमिका त्यामागे आहे. भंडारी समाजासाठी त्यांच्या हक्काचे ‘भंडारी भवन’ बांधण्याचा मानस आहे. कोकणचे ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांच्या कार्याचा देखील योग्य पद्धतीने सन्मान करण्याची जबाबदारी निश्चितपणे आमची असेल.’’
---
पराक्रमाची गाथा सर्वांसमोर!
आमदार केसरकर म्हणाले, ‘‘मायनाक भंडारी यांनी स्वराज्य रक्षणासाठी अनेक लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या. त्यांचे हे शौर्य भावी पिढीसमोर येणे आवश्यक आहे. या सभागृहाच्या माध्यमातून त्यांच्या पराक्रमाची गाथा नक्कीच सर्वांसमोर येईल.’’ याप्रसंगी आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या वंशजांचा गौरव पालकमंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT