कोकण

अणसूरमध्ये स्वच्छता अभियानास प्रतिसाद

CD

85011
अणसूरमध्ये स्वच्छता अभियानास प्रतिसाद
वेंगुर्ले ः स्वातंत्र दिनानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानअंतर्गत अणसूर ग्रामपंचायत आणि बहर महिला ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता अभियान राबविले. या अभियानात मंदिरे, शाळा, अंगणवाडी, विहिरी, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत, शासकीय इमारती, रस्ते यांची साफसफाई केली. महिलांसह पुरुष, भाजप पदाधिकारी, सरपंच सत्यविजय गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य प्रज्ञा गावडे, सीमा गावडे, संयमी गावडे, वामन गावडे, भाजप पदाधिकारी बिटू गावडे, कर्मचारी सोनू गावडे, सीआरपी शिला देवूलकर, विठ्ठल वारंग, उदय गावडे, सतीश गावडे, अंकुश तेंडोलकर आदींनी सफाई केली. या अभियानाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून १०० कडुनिंबाच्या रोपांचे वाटप केले.
........................
85012

देवगडमध्ये कर्मचाऱ्यांचा सत्कार
देवगड ः येथील पंचायत समिती कार्यालयासमोर झालेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमावेळी तालुक्यातील स्वच्छता व पाणी गुणवत्ता यामध्ये समाधानकारक कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या हस्ते त्यांना गौरविले. श्री. खराडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी तालुक्यातील स्वच्छता व पाणी गुणवत्ता यामध्ये समाधानकारक कामगिरी केलेले कर्मचारी भाग्यश्री जाधव (शिरगांव), अनंत मासये (पडेल), विष्णू घाडीगावकर (वाघोटण), शैलेश गिरकर (तिर्लोट), हेमंत तोडणकर (मिठमुंबरी) यांच्यासह बांधकाम विभाग शरद चुनेकर यांचा सन्मान केला. नारायण चव्हाण, दत्तात्रय घाडी, श्रेया अनभवणे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तनिष्क पेडणेकर या मुलाने देशभक्तीपर संवाद सादरीकरण केले. कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीचा निकाल आज जाहीर होणार! दुपारी 1 वाजल्यापासून 'या' अधिकृत लिंकवर पाहता येईल रिझल्ट, यंदा कोण मारणार बाजी?

RBI New Rules 2026 : क्रेडिट कार्ड, यूपीआय ते एटीएम; १ मेपासून काय बदललं? थेट खिशावर परिणाम

IPL 2026: मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स; करो या मरो सामना, रोहित धोनी चर्चेत, पण प्रत्यक्षात कोण खेळणार? पाहा कशी असेल Playing XI

Maharashtra Weather Update : कोकणात ढगाळ तर विदर्भात विजांचा कडकडाट! मे महिन्याच्या सुरुवातीलाच वरुणराजाची एन्ट्री; काय सांगतोय IMD चा अंदाज?

Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्य

SCROLL FOR NEXT