कोकण

गाबीत समाजातर्फे वधू-वर मेळावा

CD

गाबीत समाजातर्फे
वधू-वर मेळावा
मालवण : जिल्ह्यातील गाबीत समाजातील तरुण-तरुणींच्या विवाहविषयक समस्या लक्षात घेऊन तालुक्यात लवकरच मोफत वधू-वर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मधुचंद्र वधू-वर संस्था आणि समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या सहकार्याने हा मेळावा होणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी दिली. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सध्या गाबीत समाजातील मुला-मुलींचे विवाह जुळवताना अनेक अडचणी येत आहेत. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात येईल. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जास्तीत जास्त वधू-वर आणि त्यांच्या पालकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्याचे ठिकाण आणि तारीख लवकरच नोंदणी केलेल्यांना फोनद्वारे कळविण्यात येईल. मेळाव्याचे नियोजन गणेशोत्सवाच्या काळात करण्याचा विचार आहे. इच्छुकांनी २३ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी सुरेश बापर्डेकर, विजय राऊळ, नारायण जाधव, तुळशीदास कासवकर यांच्याशी संपर्क साधावा.
....................
रेडी येथे उद्या
नारदीय कीर्तन
आरोंदा ः रेडी ते पंढरपूर धार्मिक सहलीतील यात्रेकरू व वाडीतील सर्व मंडळींच्यावतीने मंगळवारी (ता. १९) सायंकाळी ७ वाजता श्री ब्राह्मण मंदिर, म्हारतळेवाडी रेडी येथे कुडाळ-बांव येथील गोविंद आसोलकर बुवा यांचे ‘नारदीय कीर्तन’ होणार आहे. या कीर्तनास हार्मोनियम-गजानन मेस्त्री व तबला साथ भावेश राणे देणार आहेत. याचा भाविक भक्तांनी व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...................
कवठणीत उद्या
हरिनाम सप्ताह
सावंतवाडी ः कवठणी येथील देवी माऊली देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह मंगळवारी (ता. १९) दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. स्थानिक भजन मंडळांची भजने होणार आहेत. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २०) दुपारी हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
....................
वायरीत उद्या
‘शंखचूड वध’
मालवण ः वायरी येथील केळबाई मंदिरात श्रावणी मंगळवारनिमित्त मंगळवारी (ता. १९) श्री सत्यनारायण महापूजा व सायंकाळी ७ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ, मातोंड यांचा पौराणिक दशावतारी ‘शंखचूड वध’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन केळबाई नाट्यप्रेमी आयोजक मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

आता 'या' दुकानांचा परवाना रद्द होणार, बदलापूर नगरपालिकेचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : महिला आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा; निवडणुकांत पराभूत करण्याचे आवाहन

ई-सेवा केंद्र चार दिवसांपासून ठप्प, शासकीय दाखले रखडल्यामुळे पालकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT