कोकण

राजापुरातील रस्त्यावरील खड्ड्याची समस्या दूर

CD

rat17p30.jpg
85048
राजापूरः पेव्हर ब्लॉक बसविलेला जवाहरचौक रस्ता.
-----------
राजापुरातील खड्ड्याची समस्या दूर
पेव्हर ब्लॉक बसविले ; रस्ता वाहतुकीसाठी योग्य
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी राजापूर शहर सज्ज झाले आहे. राजापूर पालिकेने आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावरील चौगुले फार्मसी ते शिवस्मारक या दरम्यान पेव्हर ब्लॉक बसवल्याने या भागातील खड्ड्यांची समस्या आता संपुष्टात आली आहे. याशिवाय, रानतळे रस्त्याच्या प्रारंभी पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ताही आता वाहतुकीसाठी सुयोग्य झाला आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाणी लोकांसह वाहनांच्या वर्दळशीने सातत्याने गजबजलेल्या भागात पावसाळ्यामद्ये मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. याबाबत रिक्षा व्यावसायिक, वाहनचालक व नागरिकांतून सातत्याने तक्रारी होत होत्या. याची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी नगर पालिका प्रशासनाला गणेशोत्सवापूर्वी त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर, मुख्याधिकारी तुषार बाबर, नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव, अभियंता रणवीर देसाई यांनी पावसाळी हंगामातील शहराच्या मध्यवर्ती भागातील समस्या दूर करण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्याचा पर्याय सूचित केला होता. त्याला आमदार सामंत यांनी सहमती दर्शवत गणेशोत्सवापूर्वी ही समस्या दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे शिवस्मारकापासून चौगुले फार्मसीपर्यंत पेव्हर ब्लॉक बसवले.
रानतळे रस्त्याच्या प्रारंभी पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ताही आता वाहतुकीसाठी सुयोग्य झाला आहे. पावसाचा जोर कमी होताच शहरातील मुख्य रस्त्यावरील अन्य भागातील खड्डे भरण्यात येणार असल्याचे नगर पालिका प्रशासनातर्फे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba River Flood : अंबा नदीने धोका पातळी ओलांडली; भेरव अंबा नदी पुलावरून पाणी, वाहतूक थांबली

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT