85222
हुतात्मांच्या शौर्याला शब्दरुपी आदरांजली
‘सतीश कथाकथन’ स्पर्धाः चिन्मय कोटणीस ठरला ‘महाविजेता’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १८ : ‘सतीश कथामाला’ कथाकथन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मुंबई विद्यापीठाच्या येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालयात उत्साहात पार पडला. या अंतिम फेरीमध्ये कळसुलकर हायस्कूल सावंतवाडीचा चिन्मय कोटणीस हा महाविजेता ठरला.
या स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी उद्घाटक तळेरे महाडिक विद्यालयाचे प्रा. अविनाश मांजरेकर, शेखर सामंत, ५८ महाराष्ट्र बटालियनचे ॲड. ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप-परिसराचे संचालक श्रीपाद वेलिंग, प्रा. हेमंत महाडिक, स्पर्धेचे परीक्षक केशव नाचिवणेकर, प्रा. राज ताडेराव, डॉ. सुजित कदम, निकेत पावसकर, समाजसेविका श्रावणी मदभावे, ५८ महाराष्ट्र बटालियनचे सीएचएम प्रदीप पाटील, शरद वायंगणकर, नीलेश सोरप, प्रवीण वरुणकर आदी उपस्थित होते.
तळेरे दळवी महाविद्यालय आणि ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. हुतात्म्यांच्या प्रेरणादायी जीवनावरील कथांच्या माध्यमातून तरुणांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. महाविद्यालयाचे मानद मार्गदर्शक विनायक दळवी यांची ही मूळ संकल्पना होती. या स्पर्धेत ज्युनिअर कॅडेट आणि सीनिअर कॅडेट अशा चार गटांमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेची सुरुवात प्राथमिक फेरीने झाली. यात प्रत्येक शाळा-महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर स्पर्धा घेऊन दोन विद्यार्थ्यांची निवड केली. दुसऱ्या ऑनलाइन फेरीत ६० स्पर्धकांमधून १२ स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी धडक मारली. महाअंतिम सोहळ्यात या १२ गुणवंत स्पर्धकांनी आपल्या कथाकथन कौशल्याची प्रभावी चुणूक दाखवली. केशव नाचिवणेकर, प्रा. राज ताडेराव, डॉ. सुजित कदम, निकेत पावसकर, श्रावणी मदभावे, प्रदीप पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
अंतिम फेरीत चिन्मय कोटणीस (कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी) याने प्रथम, वैभवी परब ( स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड) द्वितीय व आर्या चव्हाण (दळवी कॉलेज) ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. महाविजेता चिन्मय कोटणीस याला फिरती ढाल प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. नरेश शेटये यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.