कोकण

माठावर साकारला बालरुपी श्रीकृष्ण

CD

85218

माठावर साकारला
बालरुपी श्रीकृष्ण
तळेरे : गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी गोकुळाष्टमीनिमित्त माठावर बालस्वरुपातील श्रीकृष्णाचे चित्र रेखाटले आहे. या चित्राची उंची दोन इंच आणि लांबी दोन इंच आहे. या कलाकृतीबाबत माहिती देताना मेस्त्री म्हणाले की, माठावर चित्र साकारायचे उद्देश असा की, श्रीकृष्णाला माठ अत्यंत्य प्रिय आहे. गवळणी वा सर्व माता लोणी, दही, दूध माठात भरून ठेवत होत्या आणि लोणी श्रीकृष्णांना प्रिय होते. त्यामुळे माठावर बालस्वरुपातील श्रीकृष्णाचे रूप साकारले आहे. एक्रलिक कलर वापरून ही कलाकृती केली आहे.
.....................
85219

मोरपिसावर साकारली
श्रीकृष्णाची कलाकृती
तळेरे : गडमठ येथील युवा चित्रकार श्रुती सुतार यांनी गोकुळाष्टमीनिमित्त मोरपिसावर श्रीकृष्णाची कलाकृती साकारली आहे. अत्यंत सुबक आणि आकर्षक अशी ही कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्राची उंची ३ सेमी आणि लांबी २.५ सेमी आहे. मोरपिस हे श्रीकृष्णाला प्रिय असल्याने त्यावर बालरुपातील श्रीकृष्ण साकारला आहे. यापूर्वी श्रुती यांनी रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण अशी अनेक चित्रे साकारली आहेत.
---
कारिवडे-भैरववाडीत
मखर सजावट स्पर्धा
सावंतवाडी ः कारिवडे-भैरववाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेश मखर सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्थानिक उत्साही ग्रामस्थांच्या पुढाकाराने होणारी ही स्पर्धा परिसरातील गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरणार आहे. यावर्षी या स्पर्धेत आजूबाजूच्या भंडारटेंब, गोसावीवाडी आणि डंगवाडी या वाडींचा समावेश करण्यात येणार आहे. महिला वर्गासाठी यावर्षी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोन्ही स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसोबतच विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. इच्छुकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------
मालवणात उद्या
विविध कार्यक्रम
मालवण ः श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मालवण तालुका नाभिक संघटना मालवणतर्फे बुधवारी (ता. २०) भैरवी मंदिर संत सेना मार्ग, भरड मालवण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी सकाळी ९ वाजता श्री संतसेना महाराज प्रतिमेचे पूजन, १० वाजता आरती व तीर्थप्रसाद, १०.१५ वाजता कीर्तन, दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, १.३० वाजता स्नेहभोजन, ३.३० वाजता बालगोपाळ मंडळ आचरा यांचे भजन, रात्री ८ वाजता प्रसिद्ध बुवांचे भजन होणार आहे. या दिवशी तालुक्यातील सर्व सलून दुकाने पूर्ण वेळ बंद राहतील. उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका नाभिक संघटनेने केले आहे.
.....................
निगुडे येथे आज
हरिनाम सप्ताह
बांदा ः निगुडे ग्रामदेवता माऊली देवी मंदिरात उद्या (ता. १९) व बुधवारी (ता. २०) वार्षिक हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारी १२ वाजता हरिनाम सप्ताह सोहळ्याला प्रारंभ होईल. यावेळी इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली, रोणापाल, मडुरे, निगुडे गावातील ग्रामस्थांची भजने होतील. बुधवारी दुपारी १२ नंतर दिंडी, आरती होऊन हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता होईल. लाभ घेण्याचे आवाहन देवी माऊली देवस्थान समिती, निगुडे, मानकरी व ग्रामस्थांनी केले.
.....................
सावंतवाडीत उद्या
सांस्कतिक कार्यक्रम
सावंतवाडी ः सावंतवाडी तालुका नाभिक संघटना व महिला नाभिक संघटना, सावंतवाडीतर्फे दरवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी संतसेना महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा बुधवारी (ता. २०) विविध धार्मिक व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. हा उत्सव सोहळा गोविंद चित्रमंदिर हॉल, सावंतवाडी येथे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT