85347
आयडियल स्कूलमध्ये बरसल्या सुरांच्या सरी
वरवडेतील ‘श्रावणधारा’; गीत गायनात तनुश्री, पूर्वा, विनय विजेते
कणकवली, ता. १९ ः वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये जिल्हास्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा झाली. यात तनुश्री मराठे, पूर्वा मेस्त्री आणि विनय वझे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ज्येष्ठ गायक माधव गावकर यांच्याहस्ते स्पर्धेचा प्रारंभ झाला.
आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वरवडे आणि डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा’ कार्यक्रमांतर्गत सुगम संगीत गायन स्पर्धा झाली. एकूण तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते आठवी या गटामध्ये प्रथम क्रमांक तनुश्री नीलेश मराठे, द्वितीय क्रमांक आरोही मनोज मेस्त्री आणि तृतीय क्रमांक मैत्री मंदार कुंटे हिला मिळाला. उत्तेजनार्थ साठी श्रुती संजय तावडे, वेदा प्रवीण मराठे आणि ओम मेस्त्री यांची निवड झाली.
नववी ते बारावी या गटामध्ये प्रथम क्रमांक पूर्वा धोंडी मेस्त्री, द्वितीय वल्लरी नीलेश राणे आणि तृतीय क्रमांक प्रांजली कानेटकर हिने पटकावला. उत्तेजनार्थसाठी प्रणाली सुनील सावंत, शंकर राजाराम सावंत आणि कुणाल कृष्णा परब यांची निवड झाली.
खुल्या गटात प्रथम क्रमांक विनय वझे. द्वितीय क्रमांक - नारायण नाडकर्णी आणि तृतीय क्रमांक पूर्वा धाकोरकर यांनी मिळवला. उत्तेजनार्थसाठी कीर्ती गुरव, आकांक्षा राणे आणि सानिका सासोलकर यांची निवड झाली.
कार्यक्रमावेळी माधव गावकर, संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. नीलेश महिंद्रकर, डॉ. राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन गणेश घाडीगावकर, रमाकांत तेली, गणेश पारकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण शाम तेंडुलकर, विश्वास प्रभुदेसाई आदींनी केले. गायन स्पर्धेसाठी वादन साथमहेश तळगावकर आणि अभिषेक सुतार यांनी दिली. हेमंत पाटकर यांनी सूत्रसंचालन केले. डी. पी. तानावडे यांनी आभार मानले.