कोकण

-शांतता, स्थिरता, एकाग्रता दर्शविणाऱ्या मूर्ती

CD

-rat१८p२१.jpg-
P२५N८५२४८
चित्रशाळेत गणेशमूर्ती रंगकाम करताना प्रथमेश सागवेकर.
-------------
येई गणेशा---लोगो

शांतता, स्थिरता, एकाग्रता दर्शवणाऱ्या मूर्ती
सागवेकर यांची मूर्तिशाळा; चौथी पिढी साकारतेय श्रीगणेशमूर्ती
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ ः तुळशी येथील सागवेकर कुटुंबाची चौथी पिढी प्रथमेश सागवेकर व अनंत सागवेकर गणपतीच्या मूर्ती साकारत आहेत. शांतता, स्थिरता आणि एकाग्रता दर्शवणारी मांडी घालून बसलेली गणेशमूर्ती लक्षवेधी ठरत आहेत.
डोंगरावरील चिकट मातीपासून मूर्ती बनवण्याचा सुरू झालेला सागवेकर कुटुंबाचा मूर्ती घडवण्याचा प्रवास सुमारे दीडशे वर्षानंतरही चौथ्या पिढीने निरंतर चालू ठेवला आहे. चित्रशाळेतील मूर्तींना पाले, तुळशी, आंबवणे खुर्द, माहू, मंडणगड, पंचक्रोशीसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात भाविकांची मागणी आहे. सागवेकर मूर्तिकारांची कला सर्वदूर पसरली आहे. त्यांच्या जुन्या पिढीतील कलेची चर्चा आजही होते. प्रथमेश यांचे पणजोबा केशव सागवेकर यांच्यापासून ही कला जोपासली जात आहे. आजोबा शांताराम सागवेकर यांच्यानंतर वडील सुरेश सागवेकर यांनी ही कला अवगत केली. आपल्या काळात त्यांनी अनेकांना मूर्ती घडवण्याचे मार्गदर्शनही केले. पणजोबा त्या काळी रानात जाऊन डोंगरावर असणारी चिकट माती गोळा करून आणत. त्यातून मूर्ती घडवल्या जात असत. आज सागवेकरांची चौथी पिढी गणपती व अंबेच्या मूर्ती बनवत आहेत. त्यांचा घरातच पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. सिंह, गाय, मोर, गरुडावर आरूढ झालेल्या तसेच जास्वंदी, कमळफुलात बसलेल्या गणेशमूर्तींना त्यांच्याकडे मागणी असते. प्रथमेश सागवेकर हे फायबर, उडन, स्टोन, मेटल, थर्माकोलच्या मूर्ती बनवण्यात अत्यंत कुशल आहेत. गणेशमूर्ती रंगरंगोटी अंतिम टप्प्यात असून, या कामी मित्रपरिवार मदत करत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

SCROLL FOR NEXT