rat१९p१.jpg-
P२५N८५४५५
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात संस्कृत सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, मान्यवर.
संस्कृतमधील ज्ञान टिकवण्याची जबाबदारी सर्वांची
डॉ. प्रसन्न मुळ्ये ः संस्कृत उपकेंद्राद्वारे संस्कृत सप्ताह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : आजच्या आधुनिक युगात परदेशातील तरुण-तरुणी भारतात येऊन संस्कृत व शास्त्रांचे अध्ययन करत आहेत. आपले ज्ञान अमूल्य आणि त्रिकालाबाधित आहे, त्यामुळे अशा देववाणी असणाऱ्या संस्कृत भाषेतील ज्ञान टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. प्रसन्न मुळ्ये यांनी केले.
भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र व संस्कृत भारतीतर्फे आयोजित संस्कृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे केंद्रात कार्यक्रम झाला. यात गीता वेदांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्तोत्रपठण वर्ग, भारतीय संस्कृती आणि संस्कृत साहित्यावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गीता वेदांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम, स्तोत्रपठण वर्गात सहभागींसह प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. शिवस्तोत्र, विष्णू षोड्षनामस्तोत्र, सरस्वतीस्तोत्र, नवग्रहस्तोत्र, पांडुरंगाष्टकम् आदी स्तोत्रांचे पठण व अर्थविवेचन करण्यात आले. प्रश्नमंजूषा स्पर्धेत विद्यार्थी, संस्कृतप्रेमी, शिक्षकांचा प्रतिसाद मिळाला. चार गटांना एकूण पाच फेऱ्यांमध्ये भारतीय संस्कृती परंपरा आणि संस्कृत साहित्य या विषयावरील प्रश्न विचारण्यात आले. कार्यक्रमाला संस्कृत भारतीच्या कोकण प्रांत अध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये, रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. दिनकर मराठे, दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या मंत्री अक्षया भागवत आदी उपस्थित होते.
चौकट १
श्रीराम संस्कार केंद्राचे सादरीकरण
नाचणे येथील श्रीराम संस्कार वर्गातील मुलांनी लक्षवेधी सादरीकरण केले. गणितम् लघुनाटिका अन्वेष कौठणकर व अदिती गद्रे यांनी सादर केली. स्वरांजली हेगडे, विरा हेगडे, सर्वेश मराठे यांनी हस्ती हस्ती हे अभिनयगीत सादर केले. गार्गी शिंदे आणि सिद्धांत मराठे यांनी माता चिंताक्रांता या विषयावर लघुनाटिका सादर केली. संस्कारवर्गाच्या सर्व मुलांनी जयति जयति भारतमाता गीत सादर केले. या सर्व सादरीकरणाचे नियोजन श्रीराम संस्कार केंद्रप्रमुख रश्मी मराठे यांनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.