कोकण

देवगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

CD

85525

देवगडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
देवगड, ता. १९ ः तालुक्याच्या किनारी भागात पावसाने कहर केला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस चांगलाच झोडपून काढत आहे. चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे १३१ मिलिमीटर इतका पाऊस झाला. सोमवारी (ता.१८) रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. यंदाच्या हंगामात पावसाने आतापर्यंत अडीज हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, पावसामुळे समुद्र खवळला असून, स्थानिक मासेमारीला ब्रेक लागला आहे.
चार दिवसांपासून पावसाने किनारी भागात जोर धरला आहे. अधूनमधून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी रात्री आणि आज दिवसभर किनारी भागाला चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत. समुद्र खवळला असून, किनारी भागात समुद्राची गाज वाढली आहे. पावसामुळे ग्रामीण भागात पुरसदृशस्थिती निर्माण झाली होती. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. चोवीस तासांत आज सकाळपर्यंत येथे १३१ मिलिमीटर इतका पाऊस झाला. यंदाच्या हंगामात आतापर्यंत २५२८ मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. समुद्रातील वातावरण खराब असल्याने स्थानिक मासेमारी थंडावली आहे. त्यामुळे बाजारातील माशांची आवक कमी झाल्याचे चित्र होते. पावसाने बाजारपेठेत शांतता होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जांचा पाऊस! ५ हजार घरांसाठी ९८७२० अर्ज, 'या' तारखेआधीच भर फॉर्म

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पावसाची संततधार सुरूच! पनवेलमधील शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी सुट्टी जाहीर

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

SCROLL FOR NEXT