कोकण

सावंतवाडीत उद्या पाणीपुरवठा बंद

CD

85329

सावंतवाडीत उद्या
पाणीपुरवठा बंद
सावंतवाडी ः चिवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी गुरुवारी (ता. २१) स्वच्छ करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागात गुरुवारी व शुक्रवारी (ता. २२) पाणीपुरवठा बंद राहणार असून त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरकोंडपर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाचे बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, डोंगरे पाणंद, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, वजरवाडी, नाडकर्णी पाणंद, जेल परिसर, जगन्नाथराव भोसले उद्यानामागील भाग, शिल्पग्राम, श्रमविहार कॉलनीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
...................
डॉ. सूर्यवंशी यांचा
आरवलीत सत्कार
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सपत्नीक आरवली येथील श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले. याप्रसंगी वेतोबा देवस्थान, आरवलीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी देवस्थानतर्फे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी श्री देव वेतोबाची दूरवर पसरलेली ख्याती, नवसाला पावणाऱ्या देवाला करण्यात येणाऱ्या नवसांबाबतची माहिती व देवाच्या पादत्राणांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. देवस्थानचा परिसर, भक्तिमय वातावरण व सुसूत्र व्यवस्थापन याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सुप्रसिध्द साहित्यिक (कै.) जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, शिरोडा मंडळ अधिकारी नीलेश मयेकर, तलाठी ए. टी. गावडे, पोलिसपाटील मधुसुदन मेस्त्री आदी उपस्थित होते.
---
न्हावेलीत पथदीपांनी
घेतला मोकळा श्वास
बांदा ः न्हावेली-रेवटेवाडी येथे गणेशोत्सवाची स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असून ग्रामस्थांनी स्वच्छतेचा संकल्प केला आहे. गावातील पथदीपांलगत झुडपांमुळे रस्त्यावर अंधार पसरत होता. यामुळे रात्रीच्या वेळी पादचारी व वाहनचालकांना अडचणी निर्माण होत होत्या. या समस्येवर उपाय म्हणून ग्रामस्थांनी श्रमदानाचे आयोजन केले. रेवटेवाडीमधील नागरिकांनी रविवारी (ता. १७) सकाळपासून एकत्र येत झुडपांची सफाई केली. स्वच्छतेनंतर पथदीपांचा प्रकाश स्पष्टपणे दिसू लागल्याने पादचाऱ्यांची समस्या दूर झाली आहे. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे स्वच्छतेसोबतच गावातील एकोप्याचा संदेशही या उपक्रमातून दिसून येत आहे.
---
ओटवणेत शुक्रवारी
विद्यार्थी गुणगौरव
ओटवणे ः ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) आणि शिक्षण प्रसारक मंडळ (ओटवणे) यांच्यावतीने रवळनाथ विद्यामंदिरच्या शालांत परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी ३ वाजता प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ओटवणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्याध्यक्ष गणपत गावकर, रामचंद्र गावकर, मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, राजाराम वर्णेकर, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा कहर! भिंत कोसळल्याची घटना, रहिवाशांचे स्थलांतर

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Kidney Failure Causes: किडनी फेल होण्याचं कारण बनतो UTI? 'ही' 5 लक्षणं वेळीच ओळखा आणि उपाय जाणून घ्या

Wagholi News : मैदानातील ३० हजार चौरस फुटाचा पत्र्याचा मंडप अचानक कोसळला; सुदैवाने मंडपात विद्यार्थी नसल्याने जीवित हानी नाही

SCROLL FOR NEXT