कोकण

सिंधुदुर्गनगरीत शासकीय ठेकेदार एकवटले

CD

85586
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्ह्यातील ठेकेदार.


सिंधुदुर्गनगरीत शासकीय ठेकेदार एकवटले

थकीत देयकांसाठी आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके सरकारकडे थकली असून, ही देयके न मिळाल्याने कंत्राटदार हतबल झाले आहेत. हे हक्काचे पैसे मिळण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदार आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज राज्यभर धरणे आंदोलन आणि निदर्शने केली. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामविकास विभाग, जलसंपदा, जलसंधारणसह अनेक विभागांतील शासनाची विकासाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके देण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून मिळालेली नाहीत. त्यामुळे राज्यातील सगळी विकास कामे ठप्प आहेत. कुठल्याही शासकीय लेखाशिर्षकास कंत्राटदारांची देयके देण्यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही, नवीन कोणतेही सरकारी विभागाकडील विकासात्मक काम मंजूर केले जात नाही. अगोदरच निधी नाही व यामुळे राज्यातील सुबे अभियंता, ओपन कंत्राटदार मजूर संस्था, वाहतुकदार, माल सप्लायर्स, हातावर पोट असणारे रोजंदारी कामगार, कायम नोकरीस असणारा शिक्षित वर्ग यांसारखे ५ ते ६ कोटी समाजातील घटकांचा रोजगार व चरितार्थ, व्यवसाय अक्षरशः देशोधडीला लागला आहे. या सर्व उपेक्षितांचे प्रश्न, समस्या, अडचणींबाबत तातडीने मार्ग काढावा आणि हा व्यवसाय व व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कोट्यवधी घटकांना न्याय द्यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉट मिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी फेडेरेशनसारखे असोसिएशन व संघटना यांच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले. यावेळी कंत्राटदारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले. यावेळी उदय पाटील, बिपिन कोरगावकर, दीपक वारंग, पी. एम. सावंत, मयूर चव्हाण, सुभाष सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT