85616
85617
सावंतवाडी ः येथे संजू परब यांना बांदा शिंदे शिवसेनेतर्फे तब्बल ५२ किलो वजनाचा पुष्पहार अर्पण करुन वाढदिवस साजरा केला. बाजूला आमदार दीपक केसरकर आदी. दुसऱ्या छायाचित्रात केक कापून वाढदिवस साजरा करताना आमदार नीलेश राणे आदी. (छायाचित्रे ः रुपेश हिराप)
संजू परब भविष्यात नक्कीच आमदार होतील
नीलेश राणे ः सावंतवाडी येथे वाढदिवस विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः संजू परब यांनी नगराध्यक्षपदाच्या काळात आपली क्षमता सिद्ध केली असून भविष्यात ते या मतदारसंघातही ती दाखवून देतील. ग्रामीण भागाची जाण असलेला, तळागाळात काम करणारा कार्यकर्ता विधिमंडळात असणे अत्यंत गरजेचे आहे. परब यांना आमदारकीची इच्छा नसेल तरी ते एक दिवस आमदार होणारच, ही शिवसेनेची आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांना निश्चितच उज्वल भवितव्य आहे, अशा शब्दांत आमदार निलेश राणे यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख परब यांचा ५२ वा वाढदिवस आज येथे पार पडला. यावेळी शुभेच्छा देताना आमदार राणे बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा ॲड. निता कविटकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख बबन राणे, नितीन मांजरेकर, गणेश प्रसाद गवस उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘संजू परब हे माझ्या भावासारखे आहेत. त्यामुळे मी गेल्या १६ वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडीत येतो. राजकारणामध्ये चढ-उतार असूनही, पराभवांना तोंड देऊनही ते माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्यासारखी प्रामाणिक, निस्वार्थ माणसे माझ्यासोबत का राहिली, हे आजही मला कळले नाही. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वानेच त्यांना भविष्यात अनेक पदे मिळतील, याची मला खात्री आहे. परब यांच्याकडे नेतृत्व करण्याची कला आहे आणि ती योग्यरित्या वापरली गेली पाहिजे. त्यांचे योग्य नियोजन तळगाळात पोहोचावे यात परब यांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यांना नेहमीच आमची साथ आहे व राहणार आहे.’
आमदार केसरकर म्हणाले, ‘परब यांच्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांचे वय त्यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना राजकारणात खूप मोठं भविष्य आहे. त्यांनी थोडा संयम ठेवल्यास व साईबाबांचा ''श्रद्धा व सबुरी'' हा मंत्र जपल्यास ते खूप पुढे जातील. मी संजू यांना थोडं शांतपणे घेण्यास सांगितलं, तेव्हा त्यांनी निश्चितपणे संयम बाळगला. त्यांनी अशाच प्रकारे संयमाने काम केल्यास ते निश्चितच खूप पुढे जातील.’ जिल्हाप्रमुख सामंत म्हणाले, "संजू परब हा आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात घडलेला कार्यकर्ता आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदापर्यंत मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यातही त्यांनी आपल्या कामाची धडाडी अशीच सुरू ठेवावी." यावेळी सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनीही परब यांना शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांच्या शुभेच्छांना उत्तर देताना परब म्हणाले, ‘राजकारणात मी जो काही आहे तो निलेश राणे यांच्यामुळेच आहे. मला आमदारकी मिळो वा न मिळो; पण निलेश राणे यांचा माझ्या डोक्यावरचा आशीर्वाद कायम राहावा हीच माझी इच्छा आहे. जिल्हा प्रमुख म्हणून आमदार केसरकर यांच्या सोबत काम करताना वेगळीच उमेद मिळते. या दोन्ही नेत्यांनी मला जीवनात पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिले हे आशीर्वाद कायम राहावेत हीच इच्छा आहे.’ परब यांच्या ५२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा शिंदे शिवसेनेतर्फे तब्बल ५२ किलो वजनाचा पुष्पहार त्यांना अर्पण करण्यात आला. आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मतदारसंघातील तळागाळातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते वाढदिवसाला उपस्थित राहिले होते उशिरापर्यंत सर्वांच्या शुभेच्छा शुभेच्छुक सर्वांचे आभार व्यक्त केले.
---------------
परब माझ्यासोबत असल्याचा आनंद
संजू परब यांनी राजकारणात काम करत असताना रस्ते, पाणी आणि वीज या पारंपरिक कामांवर लक्ष केंद्रित न करता लोकांच्या वैयक्तिक विकासावर काम करायला हवे. समाजाला, महिला बचत गटांना काय मिळते0 तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल0 शेतकऱ्यांसाठी काय करता येईल? या सगळ्या गोष्टींचा परब यांनी विचार करावा. त्यांच्याकडे समाजसेवेचे व्रत आहे. ते नेहमीच गरीब, गरजू लोकांना आर्थिक मदत करत असतात, त्यामुळे असा व्यक्ती माझ्यासोबत आहे याचा मला अतिशय आनंद आहे, असे गौरवोद्गार आमदार केसरकर यांनी काढले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.