-rat१९p३१.jpg-
KOP२५N८५५६१
रत्नागिरी ः काजळी नदीला पूर आल्याने पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळित झाले.
-rat१९p३२.jpg-
OP२५N८५५६२
झाडगाव इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, नायब नगर येथे शेडची भिंत कोसळून तीन वाहनांचे नुकसान झाले.
----
काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत
झाडगावात भिंत कोसळून वाहनांचे नुकसान ; पावसाचा जोर कायम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली असून, रत्नागिरी तालुक्यालाही त्याचा फटका बसला आहे. काजळी नदीला पूर आल्यामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी भरले तर चांदेराई व हरचिरीमध्ये रस्त्यावर पाणी असल्याने गावातून वाहतूक बंद करण्यात आली. पुलावरील वाहतूक कुरतडेमार्गे सुरू आहे. रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे शेडची भिंत कोसळून तीन वाहनांचे नुकसान झाले. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी तालुक्यात १४०.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
जिल्ह्यातील अन्य तालुक्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले. दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुढील आठ तासामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली. पावसाचा जोर कायम असल्याने काजळी नदीला पूर येऊन चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले. हरचिरी रस्त्यावर पाणी आल्याने तेथील मार्ग बंद करण्यात आला होता. भोके येथे झाड उन्मळून पडले. त्यामुळे काही ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे झाडगाव इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, नायबनगर येथील शेडची चिऱ्याची भिंत कोसळून दोन दुचाकी तर एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. भिंतीच्या जवळच ही वाहने पार्किंग करून ठेवली होती. अतिवृष्टीमुळे ही भिंत या गाड्यांवर कोसळून हे नुकसान झाले.
जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी तलाठीमार्फत घटनास्थळाचा पंचनामा केला. सुमारे पाऊण लाखाचे वाहनाचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सायंकाळी चांदेराई पुलावरील काजळी नदीचे पाणी ओसरले होते, मात्र चांदेराई व हरचिरीमध्ये रस्त्यावर पाणी असल्याने गावातून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पुलावरील वाहतूक कुरतडेमार्गे वळवण्यात आली. समुद्रालाही उधाण असल्यामुळे मांडवी, मिऱ्या, भगवती बंदर आदी ठिकाणी मोठमोठ्या लाटा उसळत होत्या. तालुक्यातील मोठे नुकसान झाल्याची कोणतीही नोंद नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
-
चौकट
विनाकारण घराबाहेर पडू नका
रत्नागिरी व परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व विनाकारण घराबाहेर पडू नये. केवळ अत्यावश्यक कारणास्तवच घराबाहेर पडावे. प्रशासन, पोलिस यंत्रणा, महानगरपालिका व आपत्कालीन सेवा पूर्णक्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासनास सहकार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सेवाभावी संस्थादेखील मदतीसाठी तत्पर आहेत. पाऊस पूर्ण थांबेपर्यंत सुरक्षित राहा, प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.