rat20p21.jpg-
85771
एसटी बस
‘सकाळ’ विशेष-------लोगो
इंट्रो
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बीएस-६ मानांकनाच्या गाड्यांमध्ये अद्ययावत ओडोमीटर बसवले आहेत. या आधुनिक मोजमाप यंत्रामुळे मार्गावरील प्रत्यक्ष किलोमीटरची अचूक नोंद होत आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीने दर्शवलेल्या एसटी मार्गांवरील मोजमापाची पोलखोल झाली आहे; मात्र यामध्ये चालकांचे काम वाढले असून, त्यांची पिळवणूक होऊ लागली आहे. जास्त किलोमीटर आणि अधिक थांबे असल्याने दिलेल्या वेळेत गाडी जाऊन परत आणण्याची कसरत चालकांना करावी लागते. प्रवाशांनी हात दाखवला तरीही गाडी थांबवता येत नाही तसेच गाडी वेगाने चालवल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याचा वेळापत्रकावरही परिणाम होत असून, प्रवासी कमी होत आहेत. चालकांची होणारी फरफट थांबवण्यासाठी फेरमार्ग सर्व्हेक्षणचा जोर धरला जात आहे. ही बाब खर्चिक असल्याने महामंडळ त्याकडे कानाडोळा करत आहे....!
- राजेश शेळके, रत्नागिरी
-------
जुन्या मार्ग सर्व्हेक्षणाने एसटी चालकांची फरफट
फेरसर्वेक्षणाची मागणी; प्रवासी तुटण्याची भीती
एसटीमध्ये मोटारवाहन कामगार अधिनियम १९६१ नुसार चालकांना आठवड्याला ४८ तास कामगिरी व दिवसाला साधारण ८ तास स्टेअरिंग सेवा करावी लागते. वाढते शहरीकरण, नव्याने झालेले पूल, रूंदावलेल्या सीमा, वेडीवाकडी वळणे आणि वाढलेले थांबे यामुळे धाववेळ वाढली आहे. ठरवून दिलेल्या वेळेत बसेस पोहोचत नाहीत. काही मार्गावर ११ ते १२ तासांपेक्षा अधिक सेवा करावी लागते. हे नियमबाह्य असून, त्या कामाचा ताण वाढल्याने चालक आजारी पडत आहेत तसेच चालकांना शारीरिक व मानसिक त्रासही होत आहे. यामुळे अपघात वाढण्याची भीती आहेच. गाड्या वेळेवर जात नसल्याने वेळापत्रक कोलमडून प्रवासी घटत आहे. एसटीसाठी ही धोक्याची घंटा असून, त्यावर वेळीच मार्ग काढला पाहिजे. ही जीवघेणी कामवाढ रद्द करण्यासाठी फेरसर्वेक्षण महत्वाचे आहे. याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी आवाज उठवला आहे. त्यावर एसटी महामंडळ लक्ष देणार का, असा प्रश्नच आहे.
----
किलोमीटरमध्ये मोठा फरक
एसटी बसेसमधील मार्ग दाखवण्याच्या जुनाट पद्धतीने सध्याच्या प्रवासासाठी दाखवण्यात येत असलेल्या किलोमीटरची पोलखोल झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही मार्गावरील गोंधळ पुढे आला आहे. राजापूर-भाईंदर हा मार्ग ये-जा करताना प्रत्येकी ४९१ किमी मोजला जातो. म्हणजेच एकूण मार्ग ९८२ किमी होतो; परंतु जुनाट मीटरमध्ये हा मार्ग ८९८ किमी दाखवला आहे. राजापूर-बोरिवली स्लिपरचे गाडीचे नव्या नोंदणीत ८७४ किमी होत आहे. प्रत्यक्षात जुन्या नोंदीत ४२६ किमी दाखवले आहे. रत्नागिरी-मिरज मार्ग डेपोमीटरप्रमाणे ४०४ किमी आहे आणि प्रत्यक्षात तो ४१९ किमी आहे. रत्नागिरी-नाट्ये अंतर ५२ किमी आहे. या मार्गावर सुमारे ८० ते ९० थांबे आहेत. त्यामुळे दिलेली वेळ पाळणे चालकाला कठीण होते. एवढी मोठी तफावत असल्यामुळे हे अंतर कापताना चालकांना प्रवाशांच्या सुरक्षेसह वेळ पाळणे शक्य होत नाही. यामध्ये हयगयीने वाहन चालवल्यास अपघात हे होणारच आहेत.
--------------
कामगार संघटनांमध्ये एकजुटीचा अभाव
एसटी विभागाच्या अनेक पक्षांच्या कामगार संघटना आहेत. कामगारांच्या हितासाठी या संघटना काम करतात; परंतु राजकीय परिस्थिती काळानरूप बदलत गेल्याने संघटनांमध्येही दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यास संघटनाही तयार नाहीत. जो आवाज उठवेल त्याला त्रास दिला जातो. प्रशासन म्हणेल तेच खरे, असे मानले जात असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संघटनांची एकजूट नसल्यामुळे अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी पदाधिकारी पुढे येत नाहीत. या गोंधळामुळे चालकांचे काम वाढले असून, त्यांची पिळवणूक होत आहे. याबाबत कोणी उघड बोलल्यास त्याच्यावर एसटी प्रशासनाकडून कारवाईची भीती असते. त्यासाठी फेरमार्ग सर्व्हेक्षण हवे आहे, असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे; मात्र यावर उघड बोलण्यास कोणी तयार होत नाही.
चौकट
पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे जनतेच्या अडचणींबाबत संवेदनशील आहेत. त्यांनी एसटी मार्गावरील फेरसर्वेक्षणाच्या तांत्रिक गोंधळात लक्ष घालून जिल्ह्यातील मार्गांचे प्रायोगिक फेरसर्वेक्षण करून चालक व प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एक नजर
* जास्त किलोमीटरमुळे अधिक थांबे
* वेळेत गाडी जाऊन परत आणताना करावी लागते तारेवरची कसरत
* हात दाखवेल तिथे गाडी थांबवता येत नाही
* प्रवाशांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होण्याची शक्यता
* वेळापत्रक कोलमडून तुटतो आहे प्रवासीवर्ग
* कर्मचारी आवाज उठवण्यास नकारात्मक
कोट
फेरमार्ग सर्व्हेक्षणाबाबत काही चालकांच्या तक्रारी आहेत; परंतु नवीन अद्ययावत ओडोमीटर गाड्यांमध्ये बसवल्यामुळे तंतोतंत किलोमीटर मिळते. त्या मीटरप्रमाणे तिकीटही दिले जाते. तिकीट देण्यासाठी ६ किलोमीटरचा एक टप्पा ठेवला आहे. जुने मार्ग सर्व्हेक्षण आणि नवीन गाड्यांनी निघालेले सर्व्हेक्षण यामध्ये तफावत आहे. याबाबतचा डाटा तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार आहोत. त्यानंतर वरिष्ठ कार्यालय फेरमार्ग सर्व्हेक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेईल.
- प्रज्ञेश बोरसे, एसटी विभाग नियंत्रक, रत्नागिरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.