85790
लाडक्या गणरायासाठी सजली बाजारपेठ; पावसाने घातला ‘ब्रेक’
आरास, पूजा साहित्याची दुकाने सजली; व्यापारी व्यावसायाच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठा आरासाच्या साहित्यांनी सजल्या आहेत. व्यावसायिक अपेक्षित व्यवसाय होण्याची आशा बाळगून आहेत. मात्र सततच्या जोरदार पावसाने व्यापाऱ्यांची चिंता वाढवली आहे. पावसामुळे दुकानातील साहित्याची उघड्यावर मांडणी करण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे आणलेले साहित्य विक्री होण्याचीही व्यावसायिकांना धास्तीही आहे. दरम्यान, सध्या किराणा व्यावसायिकांकडे खरेदीसाठी गर्दी होताना दिसते.
रोजची वाढत जाणारी महागाई, ऑनलाईन मार्केटिंगचे वाढते प्रस्त, फिरत्या व्यापाऱ्यांची सतावणारी स्पर्धा आणि बदलते ग्राहक अशा असंख्य अडचणींवर मात करीत यंदाच्या गणेशोत्सवाचे स्वागत करण्याची तयारी स्थानिक पातळीवर सुरू आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठा मकराच्या साहित्यांनी सजल्या आहेत. मात्र, सध्या तरी व्यवसायावर पावसाचे सावट आहे. यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच अवकाळी पावसाने जोर धरला होता. त्याला जोडूनच मान्सुनचे आगमन झाले होते. तत्कालीन स्थितीत जोरदार पावसाने सर्वत्र पूरसदृश्यस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे ऐन उन्हाळी हंगामातील जवळपास महिनाभर व्यवसायाचा पावसाने वाया गेला होता. पावसाचे वेळेआधीच आगमन झाल्याने पर्यटन हंगामही आधीच आटोपला होता. त्यामुळे व्यवसायिकांना याचा फटका बसला होता. त्यामुळे आता गणेशोत्सवात व्यापार होण्याची आशा आहे. मध्यंतरी पावसाने काहीशी ओढ दिली होती. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सध्याही किनारी भागात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अधूनमधून जोराच्या पावसाची लक्षणे दिसतात. अशा वातावरणात गणेशोत्सवाची चाहुल लागली आहे. कोकणातील गणरायाचे स्वागत नेहमी उत्साहानेच होते. मात्र अलीकडे वाढती व्यवसायिक स्पर्धा, ऑनलाईनचे वाढते प्रस्त, फिरत्या व्यावसायिकांमुळे बाजारात ग्राहकांची घटणारी संख्या स्थानिक व्यावसायिकांना काहीशी सतावत आहे. त्यातच सध्या पावसाची संततधार आहे. तरीही व्यापार्यांनीही आशेच्या जोरावर दुकानामध्ये सामान भरले आहे. गणेशासाठी लागणारे आरासाचे साहित्य, पुजा साहित्य विक्रेत्यांनी आपली दुकाने साहित्याने सजवली आहेत. परंतु जोरदार पावसामुळे आरासाचे साहित्य बाहेर उघड्यावर मांडणी करता येत नाही. त्यामुळे व्यावसायिकांनी दुकानातच मांडणी केली आहे. दुकानदार व्यवसाय होण्याच्या आशेवर आहेत. काहींनी किरकोळ खरेदीला सुरूवात केली आहे. सुरूवातीच्या टप्यात किराणा सामान भरण्याकडे नागरिकांचा कल आहे. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतामध्ये काही कमी पडू नये अशी सर्वसाधारण भावना असते. त्यानंतर अन्य खरेदीकडे नागरिक वळतील. सद्यस्थितीत व्यावसायिकांनाही स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. बाजारात विविध आकारातील मखरे, सजावटीचे साहित्य विक्रीस आले आहे. त्याची मांडणी करण्यात आली आहे. किराणा व्यावसायिकांना प्रतिसाद आहे. तरीही जीवनावश्यक साहित्याचे वाढते दर, विविध वस्तुंचे कडाडले दर यामुळे नागरिकांची ओढाताण होताना दिसत आहे. व्यापार्यांनाही व्यवसाय वाढीची प्रतिक्षा आहे.
................
व्यावसायिक चिंतेत
स्थानिक बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या साहित्याची मांडणी करण्याची धांदल आहे. मात्र, पावसाने त्याला ब्रेक लावला आहे. गेले चार दिवस किनारी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आता केवळ आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने आरासाचे साहित्य विक्रीची व्यवसायिकांना चिंता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.