85884
शिडवणे शाळेच्या मुलांची
गणेश चित्रशाळेला भेट
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी ‘क्षेत्रभेट’ कार्यक्रमांतर्गत गावातील शिल्पकार सुनील पांचाळ यांच्या चित्रशाळेला भेट दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पाचे सुरू असलेले मूर्तींचे काम पाहताना मुलांना वेगळाच अनुभव मिळाला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी विद्यार्थ्यांना गणपतींच्या मूर्तींबद्दल सखोल माहिती दिली.
प्रत्यक्ष रंगकाम आणि मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रिया पाहताना मुलांचे चेहरे आनंदाने फुलले होते. विविध प्रकारच्या आणि आकर्षक चित्रांनी सजवलेल्या गणपतींच्या मूर्ती पाहून विद्यार्थी थक्क झाले. शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अशा क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. या भेटींमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले शिल्पकार आणि कलाकार घडण्यास प्रेरणा मिळते. शाळेच्या वतीने बाल शिल्पकार श्रेयांश पांचाळ याला विठ्ठल मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या वतीने सुनील पांचाळ यांचे आभार मानण्यात आले. उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी उपस्थित होत्या.
......................
85885
ग्राम महसूल अधिकारी लुबडे
यांचा खारेपाटणमध्ये सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले खारेपाटण तलाठी कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी प्रवीण लुबडे यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, गुरुप्रसाद शिंदे, जयदीप देसाई, किरण कर्ले, शितिजा धुमाळे, मनाली होणाळे, दक्षता सुतार, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, संचालक राजेंद्र वरुणकर, मोहन कावळे, विजय देसाई, प्रा. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूल प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, मंडळ अधिकारी सरिता बोवलेकर, खारेपाटण रोटरी क्लबचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, रमाकांत राऊत, मंगेश गुरव, संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, नंदकिशोर कोरगावकर, खारेपाटण केंद्रशाळा क्र.१ चे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रणय गुरसाळे आदी उपस्थित होते. एनसीसी विभागातर्फे प्रभात फेरी काढण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.