rat२०p३९.jpg-
P२५N८५९२०
रत्नागिरी ः उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटनांच्या आयोजित बैठकीत बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे व अन्य मान्यवर.
----
प्रवाशांशी उद्धट वागणाऱ्यांची तक्रार करा
राजवर्धन करपे, अवाजवी भाडे आकारू नका, रिक्षा, बस वाहतूकदारांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : अवाजवी भाडे आकारणाऱ्यांसह प्रवाशांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षा, बस वाहतूकदारांची तक्रार नागरिकांनी व्हॉट्सअॅप क्रमांकावर वाहनाच्या व प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना, बस वाहतूकदार संघटना यांच्यासोबत वाहतूक पोलिस, महामार्ग पोलिस तसेच रेल्वेपोलिस यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.
करपे म्हणाले, सर्व रिक्षाधारकांनी त्यांची वाहने रिक्षाथांब्यावर शिस्तबद्ध पद्धतीने उभी करावीत. वाहतूककोंडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अवाजवी भाडे आकारणी करणे, प्रवाशांबरोबर कोणत्याही प्रकारचे उद्धट वर्तन करू नये, वहनक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करू नये याबाबत त्यांना सूचित करण्यात आले. सर्व वाहनमालकांनी वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत, याची खात्री करावी. बस वाहनधारकांनी बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याचे खात्री करावी. बसचालकांनी मद्यप्राशन करून बस चालवू नये. तसेच त्यांना पुरेशी विश्रांती व झोप मिळेल याची ही काळजी बसमालकांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. कोणत्याही तक्रारी असतील तर ८२७५१०१७७९ या व्हॉटस्अॅप क्रमांकावर तक्रार द्या, असे आवाहन केले आहे.
यावेळी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर तसेच कार्यालयातील मोटारवाहन निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक (वाहतूक शाखा) शरद घाग, उपनिरीक्षक (महामार्ग पोलिस) चंद्रशेखर जाधव, वरिष्ठ निरीक्षक रेल्वे पोलिस सतीश विभुते, विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह सर्व रस्ता कंत्राटदारांचे प्रतिनिधी, बस वाहतूकदार संघटना व रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
चौकट
राज्य परिवहन महामंडळाच्या चालकांनी एसटी बस चालवताना सुरक्षिततेविषयी पुरेशी काळजी घेऊन बस चालवावी. वाहतुकीची कुठेही कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. बसमालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे घऊ नये याबाबत त्यांना सूचित केले आहे. परिवहन महामंडळाने रेल्वे वेळापत्रकाशी सुसंगत वेळेत एसटी बस, रेल्वेस्टेशनसाठीच्या फेऱ्यांचे नियोजन करावे, अशाही सूचना करपे यांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.