कोकण

''जिजाऊ''चे सेवाभावी कार्य गौरवास्पद

CD

86051

‘जिजाऊ’चे सेवाभावी कार्य गौरवास्पद
नीलेश राणेः मालवणात रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : जिजाऊ संस्था संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्य करत आहे. रत्नागिरी येथे संस्थेने सुरू केलेल्या रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. उपचारासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि औषधेही विनामूल्य दिली जातात. हे निश्चितच एक आदर्शवत आणि सेवाभावी कार्य आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी येथे केले.
शिवसेना उपनेते, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार राणे यांच्या हस्ते मामा वरेरकर नाट्यगृह येथे झाले.
आमदार राणे म्हणाले, ‘‘आज मालवण-कुडाळ मतदारसंघासाठी नीलेश सांबरे यांनी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज हे लोकार्पण होत आहे. नीलेश सांबरे यांचे हे सामाजिक कार्य असेच अखंडितपणे सुरू राहो.’’
याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था रत्नागिरी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी, वसंत मांडवकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, शहर प्रमुख दीपक पाटकर, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, नकुल पार्सेकर, उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, बाळू तारी, संग्राम साळसकर, स्वप्नील गावडे, राजू बिडये, अभय कदम, महेश सारंग, विलास मुणगेकर, मंदार लुडबे, अंजना सामंत, सोनाली पाटकर, गीता नाटेकर उपस्थित होते.
यावेळी दीपक पाटकर यांनी जनतेला अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नीलेश राणे सतत प्रयत्नशील आहेत आणि या रुग्णवाहिका याच प्रयत्नांचा एक भाग आहेत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT