swt2115.jpg
86054
वायरीः आमदार नीलेश राणे, दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
वायरीतील कार्यकर्त्यांचा
शिंदे शिवसेनेत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : आमदार नीलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन वायरी भूतनाथ येथील अनेक तरुणांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आमदार राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. प्रवेशकर्ते प्रशांत तोडणकर यांना शिवसेना वायरी बुथ क्र. १११ येथे नियुक्ती देण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, किसन मांजरेकर, मंदार लुडबे उपस्थित होते. यावेळी करण तोडणकर, मंदार आडकर, सागर तोडणकर, अक्षय मेथर, भावेश तोडणकर, ऋषिकेश तोडणकर, युवराज तोडणकर, स्वरुप मोर्जे, यश खोबरेकर, आनंद ढोके, रोहित चांदेकर, सूरज मोंडकर, प्रतीक मालंडकर, आकाश मोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
...................
swt2116.jpg
86055
दक्ष परब
हस्ताक्षर स्पर्धेत
दक्ष देशात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः अक्षरांची ओळ, रेषांची जोड आणि सुंदर हस्ताक्षराच्या कलेतून गोव्याच्या चिमुकल्या दक्ष परबने थेट राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. विझ इंटरनॅशनल स्पेल बी अँड रायटींग विझर्ड आयोजित राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत दक्षने तब्बल ३ लाख स्पर्धकांमध्ये बाजी मारत सातवा क्रमांक पटकावला.
पहिलीत शिकणाऱ्या या चिमुकल्याने मेहनत, आत्मविश्वास आणि लेखनकलेवर प्रेम असेल तर यश निश्चित मिळविता येते, हे सिध्द केले. या यशाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा सचिवालयात दक्षचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांनी त्याचे कौतुक करत भविष्यात तो यापेक्षा मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. दक्ष हा येथील ॲड. क्षितिज परब व अनुराधा परब यांचा सुपुत्र, ॲड. प्रकाश परब व कवयित्री उषा परब यांचा नातू आहे. तो मूळ सावंतवाडीतील असल्याने तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.