swt217.jpg
86069
सावंतवाडीः चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांसह ‘घे भरारी’ फाउंडेशनच्या पदाधिकारी.
चित्रकला स्पर्धेस सावंतवाडीत प्रतिसाद
‘घे भरारी’चे आयोजनः विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी’ फाउंडेशन सावंतवाडीच्या वतीने येथील शाळा क्रमांक ४ मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शाळेत उत्साहात पार पडला.
स्पर्धेत विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांना ‘घे भरारी’च्या पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट बक्षिसे देऊन गौरविले. यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल पालक आणि शिक्षक वर्गाने फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. ‘घे भरारी’ वर्षभर शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत विविध उपक्रम राबविते.
फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा मेघना राऊळ यांनी, महिलांनी एकत्र येऊन समाजासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. संस्थापिका मोहिनी मडगावकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याच शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या अध्यक्षा रेखा कुमटेकर यांनी शाळेचे यश आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धेचे परीक्षण सरिता फडणीस, अरुणा नाईक यांनी केले. मुख्याध्यापिका धारगळकर यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाबद्दल आभार मानले.
सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले. यावेळी गीता सावंत, शारदा गुरव, ज्योती दुधवडकर, मेघना साळगावकर, शरदिनी बागवे, प्रतीक्षा गावकर, सीमा रेडीज, मेघा भोगटे, वंदना मडगावकर, शिल्पा जाधव उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते असेः पहिला गट (पहिली व दुसरी) - अवनी घाटे, निधी घाडी, गिरिजा तुबंगी, उत्तेजनार्थ अन्वी वडार, अंकुश गाड. दुसरा गट (तिसरी व चौथी) - प्रिया मेस्त्री, रितेश परब, रागिनी पवार, उत्तेजनार्थ स्वानंदी पाटील, आदित्य येजरे. तिसरा गट (पाचवी व सहावी) - आयुष नाईक, रुही जामदार, उर्वी टक्केकर, उत्तेजनार्थ हार्दिक वरक, हर्षवर्धन भोसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.