swt2121.jpg
86061
मालवणः धुरीवाडा येथे वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे झाड कोसळले.
मालवणात अतिवृष्टीमुळे
रस्त्यावर झाड कोसळले
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ : शहरातील फोवकांडा पिंपळ ते साई मंदिर रस्त्यावर धुरीवाडा परिसरात जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे आंब्याचे झाड कोसळले. यामुळे वीजवाहिन्या तुटून वीज कंपनीचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही घटना मंगळवारी (ता. २६) सकाळी घडली.
याबाबत माहिती मिळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यांनी स्वखर्चाने झाड हटवण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था केली. त्यांच्यासोबत रेस्क्यू टीमचे सदस्य स्वप्नील परुळेकर, स्थानिक नागरिक, वीज कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचारी यांनी एकत्रितपणे काम केले. सर्वांच्या सहकार्याने हे झाड सुरक्षितपणे बाजूला करण्यात आले. झाड हटवल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती केली. सायंकाळपर्यंत परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.
या मदतकार्यात शिल्पा खोत, अमन गोडावले, गणेश चेंदवणकर, अनिकेत आचरेकर, सुनील बागवे, सर्वेश बागवे, हेमंत जोशी, रवी तोंडवळकर, महेश कांबळी, सदाशिव सावंत, दिलीप पवार, आशिष खोत, अमित खोत या स्थानिक नागरिकांसह वीज कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. खोत यांच्या नेतृत्वाखालील या जलद आणि एकत्रित प्रयत्नांमुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.