swt2119.jpg
86058
देवगडः स्थानिक संसाधन व्यक्तीसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षण झाले.
‘उमेद’ प्रशिक्षणास
देवगडात प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ः उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने स्थानिक संसाधन व्यक्ती (एलआरपी) यांचे तालुकास्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण येथे झाले. येथील पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात हे प्रशिक्षण घेण्यात आले.
यावेळी पंचायत समितीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कक्षाच्यावतीने सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी अनंत लाड यांनी रोजगार हमी योजनेबाबत तालुक्यातील उपस्थित स्थानिक संसाधन व्यक्तींना प्रशिक्षण दिले. वरिष्ठ सहायक विलास लोके, तांत्रिक सहायक अभिनय बागवे, गुरुदास चव्हाण, प्रभाग समन्वयक संगीता बांदेकर, भारती असरोंडकर उपस्थित होते.
यावेळी लाड यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये योजनेअंतर्गत देण्यात येणारे विविध लाभ, कामे, प्रस्तावास लागणारी कागदपत्रे, योजनेची ग्राम व तालुकास्तरावरील अंमलबजावणी, अभिसरण आराखडा व कामे आदी विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्थानिक संसाधन व्यक्ती यांचे योजनेबाबतचे विविध प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले.
......................
swt2120.jpg
86060
सावंतवाडी ः बुद्धिबळ स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांसोबत शुभदादेवी भोसले व अन्य.
‘मदर क्विन्स’चे विद्यार्थी
बुध्दिबळ स्पर्धेत चमकले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्विन्स इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली. यात १७ वर्षांखालील वयोगट मुलांमध्ये पार्थ गावकर याने प्रथम, विभव राऊळ याने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अथर्व वेंगुर्लेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, कार्यकारी विश्वस्त लखमराजे भोसले, विश्वस्त श्रद्धाराजे भोसले, मंडळाचे संचालक दिलीप देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर, प्रशालेचे क्रीडाशिक्षक भूषण परब, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक संघ कार्यकारी समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.