कोकण

रत्नागिरी-जिल्ह्यातील ३२ धरणे तुडुंब

CD

-rat21p29.jpg
86134
राजापूर : मुसळधार पावसामुळे अर्जुना धरण भरले.

जिल्ह्यातील ३२ धरणे तुडुंब
पावसाचा लाभ; जलसाठा १०० टक्के
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ धरणे १०० टक्के भरली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पणदेरी, तिडे, शिरसाडी, सोंडेघर, आवाशी, पंचनदी, शिरवली, कोंडीवली, गुहागर, पिंपर, फणसवाडी, मालघर, अडरे, खोपड, मोरवणे, आंबतखोल, असुर्डे, तेलेवाडी, कडवई, रांगव, शीळ, शिपोशी, व्हेळ, गवाणे, झापडे, बेणी, अर्जुना मध्यम प्रकल्प, बारेवाडी आणि चिंचवाडी ही सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. तसेच भोळवली, नातूवाडी मध्यम प्रकल्प, शेलारवाडी, गडनदी, ओझर, कोंड्ये आणि काकेवाडी धरणे ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. टांगर, पिंपळवाडी, तळवट, साखरपा, निवे आणि गडगडी ही धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. कळवंडे, पन्हळे, बेर्डेवाडी आणि तळवडे धरणांत आजही ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. मृग व जलसंधारण प्रकल्पात १६ धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सुकोंडी, शैलडी, शिवतर, कोसबी, मोर्डे, हर्दखळे, इंदवटी किंवा कोडगे, कुरंग, गोपाळवाडी, जुवाठी, वाटूळ, रेवली ही धरणे १०० टक्के भरली आहेत. कुरवळ, कशेळी आणि परुळे ही धरणे ७५ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तिवरे, राजेवाडी आणि कोंडवाडी या धरणांत ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT