-rat२१p३७.jpg-
२५N८६१७०
राजापूर ः आमदार किरण सामंत यांना निवेदन देताना मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघाचे पदाधिकारी आणि बागायतदार.
-------
बागायतदारांना नुकसान भरपाई द्या
आमदारांना साकडे ; तत्काळ विमा परतावा मिळावा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा, कमी-जास्त तापमान या कारणांमुळे यावर्षी आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिककर्जाचा परतावाही उसनवारी घेऊन बागायतदारांना करावा लागत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, तत्काळ विमा परतावा मिळावा, अशी मागणी तालुक्यातील आडिवरे, कशेळी येथील मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघाच्यावतीने आमदार किरण सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे.
मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघाच्यावतीने याबाबतचे निवेदन देत आंबा बागायतदारांच्या समस्येकडे आमदार सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, सुरेंद्र कारेकर, रवींद्र सकपाळ, प्रकाश डुकळे, अॅड. समीर कुंटे, सुहास फोडकर, राजेश पारकर, राकेश सातोपे, रवींद्र वारगावकर, सुनील रूमडे यांच्यासह आडिवरे, कशेळी परिसरातील सुमारे ५० ते ६० आंबा बागायतदार उपस्थित होते. यावर्षीच्या आंबा हंगामामध्ये मे महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रश्नाचा गांभीर्याने विचार होऊन बागायतदारांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तसेच, सर्व कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज बँका अथवा वित्तीय संस्थांमार्फत बिनव्याजी स्वरूपात मिळावे, सर्व शेतकऱ्यांनी २०२४-२५ करिता आंबा हंगामामध्ये पीकविमा उतरवलेला असून, संबंधित विमा कंपनीने अद्याप विमा भरपाई दिलेली नाही तरी ही विमा भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी, पीकविमा उतरवताना पूर्वीप्रमाणेच खराब्यांसहित लागवड क्षेत्राचा पीकविमा उतरवण्यात यावा, विमा कालावधी हा १ ऑक्टोबर ते ३१ मे असा असावा, वानर-माकडांपासून होणारी नुकसान भरपाई मिळावी, आदी विविध मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.