swt233.jpg
86534
तिरोडा ः शाळेत आरती संग्रहाचे प्रकाशन विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तिरोडा क्रमांक १ शाळेत
आरती संग्रहाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २३ ः तिरोडा क्र. १ प्रशालेत प्रियांका सावंत, सरपंच संदेश केरकर, उपसरपंच हेमंत आडारकर यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन पार पडले. उपक्रमशील शिक्षक दीपक राऊळ यांच्या संकल्पनेतून शाळेची नाळ समाजाशी घट्ट जुळावी, या अनुषंगाने प्रशालेने राबविलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांसह आरती संग्रह प्रकाशित करून शाळेची ओढ समाजामध्ये अधिकच निर्माण झाली. शाळेने राबविलेला हा उपकम स्तुत्य आहे, असे मत माजी सरपंच विश्वनाथ आडारकर यांनी व्यक्त केले.
या आरती संग्रहाचे प्रकाशन ज्ञानेश्वरीच्या प्रतिकात्मक ग्रंथाचे पूजन करून करण्यात आले. संत ज्ञानेश्वरांच्या सुवर्ण सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त सामुदायिक पसायदान घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करून प्रभातफेरी काढली. पोलिसपाटील लवू रगजी, सायली गावडे, ग्रामविकास अधिकारी मुकुंद परब, डॉ. सिद्धी शेटये, संगीता राळकर, नमिता सावंत, जोत्स्ना नवार, शिवाजी गावीत, निशा धुरी, सदाशिव परब, सिद्धी आडारकर, लतिका सातार्डेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक राऊळ यांनी केले. आभार जनार्दन प्रभू यांनी मानले.
.........................
swt234.jpg
86535
आचरा ः हायस्कूलमध्ये आयोजित रांगोळी स्पर्धेस प्रतिसाद मिळाला.
आचरा इंग्लिश स्कूलमध्ये
रांगोळी स्पर्धेस प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २३ ः न्यू इंग्लिश स्कूल आचरातर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा आठवी ते दहावी व अकरावी ते बारावी या दोन गटांत घेण्यात आली. दोन विद्यार्थ्यांचा एक गट करण्यात आला होता. आठवी ते दहावी गटात प्रथम दिव्या खोत, निधी राऊत, द्वितीय कावेरी परब, वेदिका करवडकर, तृतीय भार्गवी महाभोज, श्रावणी गवळी, उत्तेजनार्थ प्रेक्षा चिंदरकर, स्वराली देसाई, दिक्षा गावकर, देवयानी पाटणकर, द्वितीय गटात प्रथम आदिती आचरेकर, नैना जाधव, द्वितीय गार्गी नाईक, प्रांजल नलावडे, तृतीय पूर्वा परब, राजश्री बारंगळे, उत्तेजनार्थ भूमी चव्हाण, आर्या भाटकर. बी. एम. एस. आणि बी. कॉम. कॉलेज आचरा यांची अमली पदार्थ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात भूषण नाईक, कोमल गोलतकर यांनी प्रथम, वेदांत हडकर, याज्ञिक पाताडे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक भक्ती चेंदवणकर, स्नेहा पाताडे यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक प्रकाश महाभोज यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.