कोकण

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाला सर्वसाधारण जेतेपद

CD

-rat२३p२६.jpg-
२५N८६५७४
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या प्राथमिक फेरीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणारा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा संघ.
-------
‘गोगटे- जोगळेकर’ला सर्वसाधारण जेतेपद
युवा महोत्सव ; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : ५८व्या आंतरमहाविद्यालयीन मुंबई विद्यापीठ रत्नागिरी दक्षिण रत्नागिरी युवा महोत्सवामध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाने (स्वायत्त) ५० गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयामध्ये हा महोत्सव रंगला.
युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर कॉलेजने ५० गुण, भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाने २४, फिनोलेक्स अॅकॅडमी १७, देव, घैसास कीर महाविद्यालय १६, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय ११, आठल्ये- सप्रे- पित्रे महाविद्यालय देवरुखने ९, नवनिर्माण शिक्षण संस्था, संगमेश्वरने ६, देवरुख कला महाविद्यालय ६ आणि लांजा कॉलेज ५ गुण मिळवले.
या प्रसंगी मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक डॉ. नीलेश सावे यांनी सांगितले की, युथ फेस्टिवल तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो; परंतु तुम्ही किती गांभीर्याने घेत आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. विभागीय स्पर्धा ही तुम्हाला फक्त प्रवेश आहे. अंतिमला येताना तुम्ही जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रत्नागिरीतील अनेक विद्यार्थी कलाकार आज विविध व्यावसायिक कलाक्षेत्रात अग्रेसर असताना दिसतात. त्यांना या युवा महोत्सवाचा खूप मोठा फायदा झाला आहे.
बक्षीस वितरणाला भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष नमिता कीर आणि कार्यवाह दादा वणजू, पदाधिकारी विनायक हातखंबकर, प्र. प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, सांस्कृतिक समन्वयक ऋतुजा भोवड, संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांच्या सहकार्याबद्दल जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी विशेष कौतुक करून आभार मानले.

चौकट
डॉ. आंबेकर यांची तीस वर्षे
डॉ. आंबेकर हे गोगटे महाविद्यालयमधून १९९५ पासून विद्यार्थी असल्यापासून युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतला. ते आज २०२५ पर्यंत महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर समन्वयक म्हणून काम बघत आहेत. अशा प्रकारे युवा महोत्सवामध्ये सलग तीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थी नंदकिशोर जुवेकर, प्रा. वेदांत सौंदलेकर, प्रा. शुभम पांचाळ, प्रा. कश्मिरा सावंत, तेजस साळवी आणि नीलेश सावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

Mumbai Goa Highway Traffic Jam Update : झाली दिवाळी! परतीच्या प्रवासातही वाहतूक कोंडी, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा....

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

SCROLL FOR NEXT