फोटो ओळी
- rat२४p८.jpg-
२५N८६६९५
चिपळूण - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेख नाका येथे खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे
- rat२४p९.jpg-
P२५N८६६९६
संगमेश्वर बसस्थानकाजवळील शास्त्री नदी पुलावरील खड्डे बुजवण्यात आले आहेत.
- rat२४p१०.jpg-
२५N८६६९४
नावडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे बुजण्याचे काम करताना कामगार
- rat२४p११.jpg-
25N86723
आरवली-कांटे मार्गावर संगमेश्वर येथील खड्डे बुजवण्यात आले.
- rat२४p१२.jpg-
P25N86724
चिपळूण येथे रोलिंग करण्याचे काम सुरू आहे.
- rat२४p१३.jpg-
25N86725
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील पुलाजवळ सुरू असलेले काम
- rat२४p१४.jpg-
25N86726
महामार्गावर डांबर टाकून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात येत आहे.
----
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-------लोगो
खड्ड्यांवर उपाय, सुखकर प्रवासासाठी प्रयत्न
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामाला वेग ; चिपळूण, संगमश्वर, लांजा भागाला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमधून प्रवास करावा लागू नये, यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. पावसाने उसंत घेतल्यामुळे या कामाला वेग आला आहे. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा येथे महामार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून ओळख असलेला गणेशोत्सव जवळ आला आहे. प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. परंतु, ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणवासी बाप्पाला घेऊन गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जात असतात, त्या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. कोकणवासीयांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हे खड्डे तातडीने बुजवणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबईत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि दोन्ही जिल्ह्यांतील रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सुस्तावलेल्या एजन्सीने गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्डे भरायला सुरुवात केली आहे.
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेला सेवा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला होता. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवून संपूर्ण रस्त्यावर पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जेसीबी, बोझर, सिमेंट काँक्रीटीकरण, डांबरीकरण, हॉटमिक्स्चर व इतर मशिनरीच्या सहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
चौकट
सोशल मीडियावर खिल्ली
महामार्गावरील परिस्थितीबाबत सोशल मीडियावर खिल्ली उडवणारे संदेश पसरत होते. त्याचबरोबर संगमेश्वर, चिपळूण, लांजा येथूनही स्थानिक पातळीवरून आवाज उठवण्यात येत होता. चाकरमानी नाराज होऊ नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून तातडीने त्यावर कार्यवाही सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.