कोकण

देवरुखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला प्रारंभ

CD

- rat२४p५.jpg-
२५N८६६७७
देवरुख ः येथील चौसोपी वाड्यातील गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले आहे.

येई गणेशा..........लोगो

देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला प्रारंभ
प्रतिपदेला झाले आगमन; ३७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा, उजव्या सोंडेची मूर्ती
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २४ ः देवरुख येथील प्रसिद्ध कै. पंताभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यात आज प्रतिपदेपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. हा गणपती घोड्यावर आरूढ झालेला असतो. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील हा गणपती मानाचा म्हणून ओळखला जोता. शनिवारपासून चौसोपी वाड्यात आरत्यांचे सूर घुमणार आहेत.
भाद्रपद प्रतिपदेला देवरुख येथील कै. पंताभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यातील मानाच्या गणेशमूर्तीचे वाजत गाजत आगमन झाले. या गणेशोत्सवात आरत्या आणि अन्य कार्यक्रमात मोठया संख्येने भक्त सहभागी होत आहेत. गेली अनेक वर्षे प्रतिपदेच्या उत्सवाची ही परंपरा उत्साहात सुरू आहे. ही उजव्या सोंडेची मूर्ती चांदीची असून चार इंचाची आहे. चौसोपी वाड्यातील देवघरात ती वर्षभर बघता येते. मूर्ती सापडली तो दिवस होता भाद्रपद शुद्ध प्रतिपदा. त्यामुळे चतुर्थी ऐवजी प्रतिपदेला या उत्सवमूर्तीचे आगमन होते. परंपरेप्रमाणे हा गणपती अश्वारूढ असतो. लाकडी अश्वावर हाताने ही मातीची मूर्ती तयार केली जाते. सोबत रिद्धिसिद्धी आणि भालदार-चोपदार यांच्या लाकडी मूर्ती असतात. प्रतिपदेला सकाळी लवकर श्रीकांत जोशी (मोरया जोशी, मूळ घर) यांच्या गणपतीचे आगमन होऊन प्राणप्रतिष्ठा होते आणि मग चौसोपीच्या गणपतीची मिरवणूक निघते. त्यामुळे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला देवरूखला दोन गणपतींची प्रतिष्ठापना होते. अगदी साध्या कोकणी पद्धतीने डोक्यावरुन या मूर्ती आणल्या जातात. या उत्सवाला ३७५ वर्ष होऊन गेली. पेशवाई काळापासून हा उत्सव आहे. आजही हौशीने अनेक लोक या उत्सवाला येतात. या गणपतीच्या आगमनाने खऱ्या अर्थाने कोकणात गणेशोत्सवाची सुरुवात होते.

चौकट
....अशी आहे आख्यायिका
देवरूखला वरच्या आळीत जोशी कुटुंबियांचा चौसोपी वाडा आहे. त्या घराण्याचे मूळ पुरुष बाबा जोशी हे गणेशभक्त होते. ते मोरगावला मोरेश्वराच्या सेवेत होते. एके दिवशी त्यांना व्याधी निर्माण झाली. काही केल्या निराकरण होईना. तेव्हा मोरेश्वराने स्वप्नात दृष्टांत देऊन मंदिरामागे विहिरीजवळ खणण्यास सांगितले. तेव्हा पेटीत पुजलेली चांदीची गणेशमूर्ती सापडली. जोशीबुवांना आनंद झाला. काही दिवसांत व्याधीही दूर झाली. तेव्हा गणेशाने दृष्टांत दिला की, आपल्या गावी मूर्ती घेऊन जा आणि उत्सव सुरू कर. जोशी कुटुंबीयांनी त्याप्रमाणे केले आणि या उत्सवाला सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT