कोकण

बिग स्टोरी

CD

बिग स्टोरी
(
फोटो ओळी
-rat२४p२४.jpg-
P२५N८६७५५
गणपती आगमन मिरवणूक.
-rat२४p२५.jpg-
२५N८६७५६
गणेशोत्सवातील लोककलांचे खेळ.
-rat२४p१७.jpg-
२५N८६७२७
गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवताना कुरतडे येथील मूर्तिकार उमेश आंबर्डेकर.
-----------
कोकणातील गणेशोत्सव हा फक्त एक सण नाही. कोकणच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि घराघरातील भावविश्वाचा एक अविभाज्य भाग आहे. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे समुद्रकिनारी वसलेली खेडी, हिरवीगार डोंगररांग, नारळी-पोफळीची बाग, ताज्या मातीतला सुगंध आणि प्रत्येक घरातून येणारी ‘गणपती बाप्पा मोरया’ची हाक. या काळात कोकणातील प्रत्येक गाव अक्षरशः जिवंत होते. स्थलांतरित झालेली कुटुंब गावाकडे परततात, घराघरातली स्वच्छता, सुबक मातीची किंवा शाडूची मूर्ती, पारंपरिक पद्धतीचे जेवण, मोदकांचा गोड सुगंध तसेच झेंड्यांनी, कंदिलांनी आणि फुलांनी सजलेली घरे, सगळं वातावरण प्रसन्न करतं. गावागावांतून ऐकू येणारा ढोलताश्यांचा गजर, भजन-किर्तनांचे सूर, पारंपरिक लोककलांचा जागर आणि रात्री दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेलं गाव हा एक अद्भुत अनुभव असतो. कोकणातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नाही तर एकत्र येण्याची, नातेसंबंध घट्ट करण्याची आणि परंपरेचं संवर्धनाचा उत्सव आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे भक्ती, परंपरा,संस्कृतीसह निसर्ग उत्सवाचा सुंदर संगम होय.

- सचिन माळी, मंडणगड
---
टीप- हेडिंगमधील कोकणातील गणेशोत्सव हे खाली घेऊन मोठे केल्यास उत्तम)

भक्ती, आनंद अन् परंपरेचा संगम
‘कोकणचा गणेशोत्सव’

उत्सवप्रिय कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा मोठ्या भक्तिभावात साजरे होतात. कोकणी माणूस व्यवसाय, उद्योग, नोकरी निमित्ताने बाहेरगावी कुठेही गेले असले तरी आपल्या घरी गणपती उत्सवाला आवर्जून येतात. हा उत्सव मुख्यतः भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत चालतो. काही ठिकाणी २१ दिवस गणपती आणण्याचीही प्रथा आहे. भंडारी समाजात काही ठिकाणी दसऱ्यापर्यंत गणेशमूर्तीचे पूजन केलं जातं. बालगणपतीपासून खूप मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. काही कुटुंबात गणेशमूर्ती घरी न आणता नदीवर तिथल्याच मातीचा गणपती करून तिथे त्याची पूजा-आरती व लगेच उत्तरपूजा करून विसर्जन करण्याचीही प्रथा आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळ्याचा स्वयंभू गणपती हाच आमचा गणपती अशी तेथील गावकऱ्यांची भावना असल्याने गणपतीची मूर्ती घरी न आणणाऱ्यांचे गाव म्हणून गणपतीपुळ्याची वेगळी ओळख आहे. तसेच ‘एक गाव एक गणपती’ असा आदर्श निर्माण करणारे हे गाव आहे. अशीच प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील कोईल गावामध्ये आहे. काही कुटुंबीयांचे कुलदैवत गणपती असल्याने कुलदैवतेची मूर्ती विसर्जन करायचे नाही म्हणून माघ शुद्ध/वद्य प्रतिपदा ते पंचमी असा गणेशोत्सव साजरा करण्याचा परिपाठ आहे.


*कुटुंबासाठी ऊर्जावर्धक
पिढ्यानपिढ्या एकाच विशिष्ट चित्रशाळेतून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवून घेण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. यातूनच मूर्तिकार व गणेशभक्त कुटुंबीय यांच्यातील ऋणानुबंध दृढ होतात. शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचा सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून बदल दिसून येतो. कोकणातील गणपती सण हा कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा एकूणच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुण्यांची रेलचेल, मुलांची धम्माल, जुन्या पिढीच्या पूर्वजांचे स्मरण करणाऱ्या गप्पा, नाचगाण्यांची बेधुंद करणारी जागरणं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणं हे सारे ऊर्जावर्धक आहे.

*संघटित उत्सवाचे स्वरूप
कोकणात सार्वजनिक वा घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो. अनेक गावांतून, गावांतील ४०-५० कुटुंबीयांचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाहून नेतात. गावांतील लोक, आबालवृद्ध महिला, उत्सवाचे कार्यकर्ते पारंपरिक वेशामध्ये लेझीम खेळत, नाचत गात ढोलताशांच्या गजरांत गुलाल उधळत वाजतगाजत गजाननाचे स्वागत करतात. यातून कोकणातील संघटित उत्सवाचे स्वरूप लक्षात येते.

*नातेसंबंधांना बळकटी
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. आरतीची मजा ही आगळीवेगळी असते. नातेवाईक, शेजारीपाजारी सगळे जमून प्रत्येक घरी वेळा ठरवून तालासुरांत वेगवेगळ्या चालींमध्ये आरत्या म्हटल्या जातात. दोन दोन तास टाळ, झांजा, ढोलक-मृदंगाच्या साथीने भक्तीत एकरूप होणारे भक्तगण कोकणातच आढळतात. वर्षभर कधी कुणाकडे जाणं होत नसलं तरीही आरतीला, गणपती पाहायला एकमेकांकडे जाण्याची पद्धत इथे आहे. या भेटीमुळे नाते संबंधांनाही बळकटी येते.

चौकट
व्यावसायिकांना बळ देणारा उत्सव
या उत्सवाची तयारी एक महिन्यापासून सुरू असते. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दीड लाखाहून अधिक घरगुती तर शंभरहून अधिक सार्वजनिक गणपतींची स्थापना केली जाते. त्यासाठी अगदी पाचशे रुपयांपासून ते १० हजार रुपयेही मोजले जातात. यामधून सरासरी काही कोटींची उलाढाल होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या गणेश कार्यशाळा आहेत. गणेशमूर्ती बनविण्याच्या या व्यवसायातून सुमारे १५ ते २० कोटींची उलाढाल होत असावी असा अंदाज आहे. तसेच मखर, सजावट साहित्य, फळं-फुले, वाद्य यासह कपडे खरेदीसाठी स्थानिकांसह मुंबईकर चाकरमानी बाजारात दाखल होतात. रत्नागिरी आणि चिपळूण या दोन शहरातील मोठ्या बाजारपेठांसह उर्वरित दापोली, खेड, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर, देवरूख, लांजा, राजापूर या शहरांच्याठिकाणीही बाजारपेठेत गर्दी होत असते. तसेच ग्रामीण भागांच्या ठिकाणीही छोटे-छोटे बाजार भरत असतात. तेथील दुकानांमध्येही खरेदी असतेच. यामधून गणेशोत्सवातून व्यावसायिकांनाही उत्पन्न मिळते. त्यामुळे हा उत्सव व्यावसायिकांना आर्थिक बळ देणारा आहे.

चौकट
वाद्यखरेदीवर भर!
गणेशोत्सवात घरोघरी आरत्या, भजने नियमित होत असतात तसेच वाडीवस्तीवर ढोल, बेन्जो पथके कार्यरत आहेतच. जाखडीसह कोकणी लोककला जपणारी मंडळेही आहेत. गणेशोत्सवात या लोककलांच्या सादरीकरणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले असतात. त्यात ढोलकी, नाल, पखवाज, टाळ व चकवा, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे ढोल, बेन्जोचे साहित्य, ढोलपथकांसाठी लागणारे मोठे ढोल यांच्या खरेदीसह दुरुस्तीवर दरवर्षी मोठा खर्च होतो. त्यामधून शेकडो व्यावसायिकांना हातभार लागतो.

*गणेशोत्सवातील बदलते ट्रेंड
पावसाळी निसर्ग बहरल्यामुळे डोळ्यांना सुखावणारे कोकण अनुभवण्याची संधी मिळते. सोशल मीडियावर कोकण गणेशोत्सव आवर्जून पाहिला जातो. दोन महिने आधीच गणपती आगमनाची गाणी, कथा, उत्कंठा वाढविणाऱ्या वेबसीरिज सोशल मीडियावर प्रसारित केल्या जातात. त्यातून कोकणकरांची या सणाची उत्सुकता वाढते. सजावट स्पर्धा, कोकण संवर्धन, कोकणी परंपरा, कोकणी कला यावर भाष्य करणारे उपक्रम याची नव्या पिढीकडून नवनवीन कल्पनांची अंमलबजावणी केली जाते.

*कलगीतुरा सादरीकरणातून चाहूल
कोकणची पारंपरिक लोककला जाखडी नृत्य म्हणजे गौरी गणेश नृत्य ही कला कलगीतुरा म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी नाट्यगृहातून ही कला जून महिन्यापासून गणपती आगमनापर्यंत मोठ्या प्रमाणात सादर होते. गणपती, कोकण आणि कोकणकर यांचे भावबंध या लोककला सादरीकरणातून शाहिरांकडून उलगडले जातात.सांस्कृतिक उपक्रमांवर भर देत अतिशय सद्भावनेने लोककला संवर्धनाचे व संस्कृती जपण्याचे उदात्त कार्य या उत्सवाद्वारे होते. स्थानिक कलाकारांसाठी प्लॅटफॉर्म असून सांस्कृतिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाची ओळख. कोकणात प्रत्येक वाडीवर भजनी मंडळ असतं. गण, स्तवन, अभंग, गवळण, कव्वाली, भारुड आणि शेवटचा गजर असं भजनाचं रूपडं असत. गावकऱ्यांच्या सोबतीने आणि टाळ मृदंगाच्या साथीने भजन भक्ती ही कोकणची खासियत आहे. गणेशोत्सवात भजनांना अधिकच रंग चढतो.

चौकट
नमन हे एक भक्तिपर गीत
नमन म्हणजे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गायले जाणारे प्रारंभीचे गीत. हे एकप्रकारे भक्तिपर गीत असून, त्यातून गणपतीला वंदन करून, त्याची स्तुती करून पुढील सर्व कार्यक्रमांना प्रारंभ केला जातो. कोकणातील नमनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रत्येक गावात आपली परंपरा जपणारे खास ओव्या, गीतं किंवा पदे नमन म्हणून गायली जातात. पारंपरिक वाद्यांच्या साथीने नमन गायले जाते. यामुळे नमनात गणपतीची स्तुती, त्याच्या विविध रूपांचे वर्णन आणि गणेशोत्सवात येणाऱ्या पाहुण्यांना केलेलं स्वागत याचा समावेश असतो. पारंपरिक नमन बहुतेक ओवीछंदात किंवा भजनाच्या धर्तीवर असते. सर्वसाधारणपणे सार्वजनिक गणेशोत्सवामधून अनेक प्रकारची व्याख्याने, परिसंवाद, ज्ञानसत्रे चालतात. काही ठिकाणी गावांतील उत्साही मंडळी एकत्र येऊन नाटकं बसवतात. खेडेगावांतून कलात्मक व धार्मिक चित्रपटही दाखवले जातात, काही ठिकाणी गाण्याच्या मैफलीही होतात.

*गौरी ओवसाची परंपरा
कोकणांमध्ये गणपतीच्या शेजारी गौरीची स्थापना करतात. गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे. भाद्रपद शुद्ध पक्षात, ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात. आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासोबत त्यांचं विसर्जन करायचं अशी चाल आहे. गौरी मुखवट्यांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरड्याच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खडय़ांच्या रूपात पुजल्या जातात. मुखवट्याच्या गौरी अत्यंत आकर्षक, सुंदर व अलंकृत असतात. या ‘गौरी ओवसा’ करण्याची पद्धत असल्याने या सणाला माहेरवाशिणी माहेरी येतात. किनारपट्टीलगत असलेल्या कोळी समाजातही गौरी सणाचे विशेष महत्त्व आहे. गौरी ही समृद्धीची आणि धान्याची देवता आहे. कोकण प्रांतात सर्वप्रथम निघणारे धान्य, बाजरी, कुळीथ आदींची देखभाल व्हावी म्हणून केळीच्या पानावर पाच खडे आणावेत व हे खडे जलदेवता म्हणून पुजावेत असाही गौरी व्रताचा संबंध आहे. गौर रडविणे, तिला निरोप देणे हा सासर आणि माहेर यांतील भेद उलगडणारा क्षण ठरतो.

*देखाव्यातून प्रबोधन, जागृती
सार्वजनिक मंडळ तसेच कौटुंबिक उत्सवात जीवंत देखाव्यातून दिल्या जाणाऱ्या प्रबोधनात्मक सामाजिक संदेशाकरिता पूर्ण राज्यात कोकण परिचित आहे. जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धा आयोजित करून त्यांना रोख रक्कम व गौरवचिन्ह प्रदान करून सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते. शेतकरी व कष्टकरी समाजातील व्यक्तीनी एकत्र येऊन श्रमदान करीत टाकाऊ वस्तुपासून सुंदर व आकर्षक पद्धतीने केलेली मांडणी आणि त्यातून करण्यात येणारे सामाजिक प्रबोधन हे उत्सवाचा मुळगाभा जपणारे आहे. जीवनातील वास्तव प्रश्न, समस्या तसेच समाजमनावर प्रभाव टाकणाऱ्या घटनांचे आरास, देखाव्यातून होणारे सादरीकरण हे विशेष म्हणावे लागेल.

- rat२४p२२.jpg-
२५N८६७६६
प्रथमेश सागवेकर

कोट १
गणेशमूर्ती मनोहारी, लक्षवेधी असावी यासाठी भक्त आग्रही असतात. मूर्तीवर कोणते रंग घ्यावेत असेही काहीजण सांगतात. त्यातून गणपती बाप्पाशी त्यांची असणारी अटेचमेंट दिसून येते. मूर्तीचे काम कुठपर्यंत आले आहे हे पाहण्यासाठी देखील भाविक येतात. मुंबईत स्थलांतरित झालेले कोकणकर व्हिडिओ कॉलद्वारे मूर्ती पाहून घेतात.

- प्रथमेश सागवेकर, मूर्तिकार
---
- rat२४p२३.jpg-
२५N८६७६७
वेदमूर्ती प्रथमेश जोशी

कोट २
कोकणातील गणेशोत्सव हा भावनिक, भक्तीमय, साधेपणाचा, आनंदाचा आणि शास्त्राला साजेसा असा उत्सव आहे. त्यामुळेच गणेशोत्सव म्हटले की सर्वप्रथम कोकण आठवते. वर्षभर श्रमिक कष्ट करणारे कोकणकर हे या उत्सवानिमित्ताने आनंदमयी ऊर्जा मिळवतात.

- वेदमूर्ती प्रथमेश जोशी, मंडणगड

---
- rat२४p१.jpg-
२५N८६६७३
समीर तटकरे

कोट ३
कोकणचा गणेशोत्सव म्हणजे आत्मिक सुख देणारा क्षण. यानिमित्ताने होणारे कार्यक्रम आणि जागरण यातून सादर होणाऱ्या लोककला कोकणची विशेष ओळख आहे. कलाधिपतिची लोककलेतून एकप्रकारे मनोभावे पूजाच केली जाते. कलाकारांना यातून प्रोत्साहन मिळते. तसेच त्याला ग्लोबल स्वरूप प्राप्त झाल्याने अर्थार्जनही होते. या पार्श्वभूमीवर तयार होणारी गाणी कोकणची लोकसंस्कृती, परंपरा दाखविणारी आहेत.
- समीर तटकरे, शाहीर, गायक
---
- rat२४p२.jpg-
P२५N८६६७४
गणेश भिंगार्डे

कोट ४
सध्या महागाई वाढलेली आहे. त्याचा परीणाम बाजारपेठेवर होत आहे. आधीच ऑनलाइन खरेदीमुळे कोरोनानंतर मोठा फटका व्यावसायिकांना बसलेला आहे. शोभेच्या वस्तूंची खरेदी कमी झाली आहे. या वस्तू बहुसंख्य ऑनलाइन मागवतात. ग्राहक दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या खरेदीला नागरिक बाहेर पडत आहेत. लोकांनीही स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी बाहेर पडले पाहिजे.
- गणेश भिंगार्डे, अध्यक्ष, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ
----
- rat२४p२१.jpg-
P२५N८६७४४
अशोक वालम

कोट ५
सत्तर ऐंशीच्या दशकात कोकणवासीय नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरात उपजीविकेसाठी स्थलांतरित झाले. मात्र त्यांची नाळ ही कोकणाशी कायम आहे. चाकरमानी म्हणजे स्वातंत्र्य गमावलेले, गाव सोडून न परतलेले, परावलंबी झालेले असा अर्थ आहे. त्यामुळे यापुढे स्वावलंबी उपजीविका, गावाशी नाळ जोडलेले, संस्कृतीचा रक्षणदार आणि अभिमानाची ओळख म्हणून यापुढे कोकणकर असाच उल्लेख करावा.
- अशोक वालम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बीडमध्ये राडा! लक्ष्मण हाके अन् पंडितांचे कार्यकर्ते समोरासमोर; हाकेंनी दिल्या थेट शिव्या

Latest Marathi News Updates: येवला रस्त्यावरील अतिक्रमण हटवले

Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Mutual Fund Tips: महिलांसाठी म्युच्युअल फंड: छोट्या गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं?

नवा अंदाज, नवी जोडी! सुबोध भावे आणि मानसी नाईक घेऊन येतायत ‘सकाळ तर होऊ द्या’! दोघांचं ‘नाच मोरा’ गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावलं!

SCROLL FOR NEXT