कोकण

-लाळग्रंथीतील १५ मिमी स्टोन यशस्वीरित्या काढला

CD

लाळग्रंथीतील १५ मिमी खडा यशस्वीरीत्या काढला
६५ वर्षीय रुग्णाची अतिक्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी; ‘आरोग्य योजना’तून मोफत उपचार
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २५ : तब्बल ६५ वर्षीय रुग्णाच्या डाव्या मानेवर गाठ आणि गेल्या महिन्यापासून तोंडात पस येण्याचा त्रास सुरू होता. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करूनही तात्पुरता आराम मिळत होता; मात्र त्रास कायम राहिला. शेवटी रुग्णाने वालावलकर रुग्णालयात डॉ. प्रतीक शहाणे यांच्याकडे उपचार घेतले. रुग्णालयात अतिशय कुशलतेने अतिक्लिष्ट शस्त्रक्रिया पार पाडली असून, सुमारे १५ मिमी आकाराचा खडा बाहेर काढण्यात आला.
प्राथमिक तपासणीनंतर सोनोग्राफी व एमआर सियालोग्राफी करून लाळग्रंथीत खडा (स्टोन) असल्याचे निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाने डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांनी अतिशय कुशलतेने ही अतिक्लिष्ट शस्त्रक्रिया पार पाडली. यात सुमारे १५ मिमी आकाराचा स्टोन व त्यासोबत आजूबाजूचा लाळग्रंथीचा भाग यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला. या शस्त्रक्रियेमध्ये चेहरा वाकडा होणे, तोंडाची चव जाणे अशी गुंतागुंत होण्याची शक्यता असते; मात्र संपूर्ण शस्त्रक्रिया कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. गौरव, डॉ. हिमानी आणि डॉ. प्रदीप पाटील यांनी मोलाची साथ दिली. सद्यःस्थितीत रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.

चौकट
शस्त्रक्रिया मोफत
लाळग्रंथीच्या संसर्गामुळे सूज येते आणि लाळेद्वारे पस बाहेर पडतो. हा पस जमा होऊन लाळग्रंथीत स्टोन तयार होतो. त्यामुळे ताप येणे, मानेवर गाठ येणे, तोंडात पस जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वालावलकर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया ‘महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना’ अंतर्गत मोफत केली जाते, अशी माहिती रुग्णालयाचे रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Dhirendra Shastri Health : बाबा बागेश्वर धीरेंद्र शास्त्रींची तब्येत बिघडली; सनातन एकता पदयात्रेत आली चक्कर अन् झाले बेशुद्ध

ज्या सिनेमाने लोकप्रियता दिली त्यानेच बायकोही दिली; '३ इडियट्स'मधील मिलीमीटरच्या पत्नीला पाहिलंत का? १६ वर्षांनंतर असा दिसतोय अभिनेता

Satana News : अवकाळीनंतर आता 'थंडी'चा तडाखा! सटाणा-बागलाणचा पारा 11 अंशांवर, नागरिकांना हुडहुडी भरली.

Latest Marathi Breaking News Live : अमरावतीच्या मेळघाटात जून पासून कुपोषणाने ६५ बालकांचा मृत्यू..

बर्फ ही बर्फ! Snow AI ट्रेंडमध्ये बनवा स्वतःचे भारी फोटो..एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT