-rat२५p३३.jpg-
P२५N८७०२८
चिपळूण ः येथील रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या प्लॅटफार्म क्रमांकावरील मार्गिका वापरात आणली जाणार आहे.
---
चिपळूण रेल्वेस्थानकावर तिसरी मार्गिका
पाणी भरण्यासाठी उपयोग ; अन्य दोन्हीचा नियमित वापर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना पाणी भरण्यासाठी चिपळूण रेल्वेस्थानकावरील तिसरी मार्गिका सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा प्रतीक्षा कालावधी कमी होईल आणि त्या वेळेत स्थानकात पोहचतील.
कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर यांनी आज या मार्गिकेची पाहणी केली. कोकण रेल्वेमार्गावर दिवसाला ५४ रेल्वेगाड्या धावतात. यातील बहुतांशी रेल्वे पाणी भरण्यासाठी चिपळूणच्या स्थानकावर थांबतात. येथील रेल्वेस्थानकावर दोन प्लॅटफॉर्म आहेत. दोन प्लॅटफॉर्मच्यामधील तिसरी मार्गिका मालवाहतुकीच्या रेल्वेगाड्यांसाठी वापरली जाते. मुंबईतून येणारी रेल्वे फ्लॅटफॉर्म क्र. २ वर थांबवली जाते. गोव्याकडे जाणाऱ्यांना प्रवाशांना गाडीत प्रवेश करता यावा तसेच मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांना सुखरूप उतरता यावे यासाठी रेल्वे २ ते ५ मिनिटे थांबते. या रेल्वेत पाणी भरायचे असेल तर ती चिपळूण रेल्वेस्थानकावर काही मिनिटे उशिरा थांबते. या दरम्यान मुंबईतून गोव्याकडे जाणारी किंवा गोव्याहून मुंबईकडे जाणारी दुसरी रेल्वे येणार असेल तर तिला पुढे जाण्यासाठी दुसरी मार्गिका खुली ठेवलेली असते. याचवेळी सुरक्षिततेची खबरदारी घेताना काही रेल्वे रत्नागिरी, संगमेश्वर, खेड, माणगाव, रोहासह लोकल स्थानकावर थांबवल्या जातात. चिपळूणला पाणी भरून झाल्यानंतर ती रेल्वे पुढे सोडली जाते. त्यानंतर इतर ठिकाणी थांबवलेल्या रेल्वेना हिरवा झेंडा दाखवला जातो.
कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या ५४ गाड्यांपैकी केवळ २० गाड्यांना चिपळूण स्थानकावर थांबा आहे; मात्र ज्या गाड्यांना चिपळुणात थांबा नाही अशा रेल्वेही चिपळूणमध्ये पाणी भरण्यासाठी थांबतात. त्यामुळे अन्य रेल्वेंना उशीर होतो. त्यावर उपाय म्हणून कोकण रेल्वेने वालोपे स्थानकावर इंडियन ऑलचा डेपो असलेल्या बाजूची तिसरी मार्गिका चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट
कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या केवळ पाणी भरण्यासाठी चिपळूणला थांबतात. ज्या गाडीमध्ये पाणी भरायचे आहे ती गाडी तिसऱ्या मार्गिकेवर थांबली तर इतर दोन्ही मार्गिका खुल्या राहतील. त्यातून वेळेची बचत होईल आणि क्रॉसिंगवर गाड्या थांबवण्याची वेळ येणार नाही.
- सचिन वहाळकर, सदस्य, कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.