कोकण

-गणपती विशेष

CD

- rat26p4.jpg-
P25N87151
टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या हिरकमहोत्सवी वर्षात आयोजित कार्यक्रमावेळी कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी उपस्थिती लावली.
- rat26p7.jpg-
25N87154
टिळक आळी येथील गणेशोत्सव
- rat26p8.jpg-
25N87155
गणेशोत्सवासाठी सजवलेला मंडप


------
डोके ः गणेशोत्सव उत्सव
बप्पा मोरयाऽऽऽ
-----
पारावरचा गणपती म्हणजेच पारावरचा गणेशोत्सव. आधीच्या पिढीमधील आबालवृद्धांचा आठवणीमधील मनावर कोरलेला शब्द. आता त्याचे नामकरण आणि नवी ओळख टिळकआळीचा गणेशोत्सव असे झाले. यावर्षी या उत्सवाची शताब्दी साजरी होत आहे. या सार्वजनिक उत्सवाची शंभरी जीवनामध्ये अनुभवता येत आहे यासारखा दुसरा सुवर्णक्षण नाही. टिळक आळीमध्ये आजपर्यंतचे सर्व आयुष्य जगलेल्यासाठी तेथील एका ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सवाचे साक्षीदार होणे हा तर खरेच दुर्मिळ योग. लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेतून प्रेरणा घेऊन सुरू झालेला रत्नागिरीमधील सर्वात जुना आणि शिस्तबद्ध म्हणून सर्वदूर कीर्ती मिळविलेल्या उत्सवाने काय दिले, त्याचे वैशिष्ट्य काय, त्याचा प्रभाव दोन पिढ्यांवर कसा पडलाय याचा धांडोळा गेली ५० वर्षाहून अधिक काळ या उत्सवात सक्रीय असणाऱ्या कार्यकर्त्याने घेतला आहे.

-धनंजय भावे, रत्नागिरी
------
(टीप- २७ तारखेला प्रसिद्ध करायचे आहे. अर्धे पान जाहिराती आहेत. त्यावरती हा लेख घ्यायचा आहे.)

धार्मिक, सामाजिक प्रबोधनाची शताब्दी
ः़''टिळक आळी गणेशोत्सव’

सन १९२६ मध्ये ’लोकमान्य टिळक संघ’ या त्यावेळच्या ‘मधल्या आळीतील’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी समाजप्रबोधनाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सध्याच्या पाराचे देवळासमोरच्या ‘अन्नपूर्णा’ बंगल्याच्या माडीवर सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला. प्रामुख्याने या मंडळींमध्ये वामनराव केळकर, दिनकरअण्णा जोगळेकर, शेवडे मास्तर, लखुनाना गोगटे, दत्तोपंत आगाशे, विष्णूपंत जोगळेकर, बापू व तात्या परांजपे, ना. ग. काळे, दिगंबरकाका जोशी, नारायणराव लिमये, विसूभाऊ लिमये आदींचा समावेश होता. पारतंत्र्यात समाजप्रबोधन हेच उद्दिष्ट गणेशोत्सवातील कार्यक्रमामध्ये ठेवले जात असे! भिडे वकील, मोरोपंत जोशी, चिपळूणकर वकील यांची व्याख्याने याच काळात गणेशोत्सवात झाली. दत्तोपंत आगाशे उत्सवाचे पहिले अध्यक्ष. वर्गणी बेताचीच जमायची, मात्र कमी पडल्यास येऊन घेवून चला असे सांगणारे उत्साही देणगीदारही असायचे. ‘श्रीं’ची मूर्ती पेंटर गोगटे यांनी तयार करावयाची आणि सर्वसामान्यतः असा पायंडा असे की ज्या मूर्तिकाराकडे पारावरच्या गणेशोत्सवाची मूर्ती त्याचेकडेच मधल्या आळीतील कार्यकर्त्यांच्या घरची मूर्ती सांगितलेली असायची. पेंटर गोगटे यांनी नेहमी विनामूल्यच ‘श्री’ ची मूर्ती उत्सवासाठी तयार करून दिली.
सन १९२८ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पहिले व्याख्यान टिळक आळीच्या या गणेशोत्सवात झाले आणि तेथून पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये वास्तव्य करून असेपर्यंत गणेशोत्सवामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्याख्यान सर्वप्रथम होत असे. काळानुरूप करमणुकीचे कार्यक्रम होत असत. पण व्याख्यानांवर जास्त मदार! गणेशोत्सव मंडळाने केव्हाही केसरी कार्यालयाकडे एखाद्या वक्त्याची मागणी करावी आणि केसरीने उत्तम वक्ता पाठवून ती पूर्ण करावी असे जणू ठरूनच गेले होते. पुढच्या काही कालावधीपासून ते अगदी कालपरवापर्यंत सोलापूरचे रामभाऊ राजवाडे, प्राचार्य जावडेकर, डॉ. किबे, कवी माधव ज्युलिअन, जिल्हा न्यायाधीश, पुरुषोत्तम मंगेश लाड, डी. आर. प्रधान, न्यायमूर्ती राम केशव रानडे यांच्या व्याख्यानांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची ख्याती दूरवर पसरत गेली. आमदार आठल्ये गुरुजी यांचे विधानसभेतील गमती जमती या विषयावरील व्याख्यान, प्रा. वर्दे , प्रा. शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानमाला ही समाजप्रबोधनाची परंपराच.
पारतंत्र्याच्या अखेरच्या कालावधीत सुमारे १९४२ च्या लढ्यापासून १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत गणेशोत्सवामध्ये सर्वतोपरी राष्ट्रीय वृत्ती जोपासण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन असे. प्रभातफेरी, स्वदेशी कापडविक्री, चहा सोडण्याच्या शपथा, सहभोजन इत्यादी समाजसुधारक कार्यक्रम याच कालावधीतले आणि या योजना यशस्वी होण्यास कारण म्हणजे गणेशोत्सवातील विद्वानांची भाषणे! राष्ट्रीय मेळा, संगीत मेळा असे. याचवेळी गणेशोत्सवात धनुष्यबाण स्पर्धा, पोहण्याच्या स्पर्धा इत्यादी राष्ट्रीय वृत्तीला पोषक अशा स्पर्धा भरविल्या जात असत.
सुमारे १९५२ नंतर मारुती गणपती पिंपळपार देवस्थान या सार्वजनिक वास्तूत गणेशोत्सवाचे नामाभिधान टिळक आळी गणेशोत्सव असे झाले. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी पारावर जमून वर्गणी गोळा करण्यापासून ते कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, अंगमेहनतीने रंगमच उभारणीपर्यंत सर्व काही अत्यंत अल्प कालावधीत घडवून आणण्याचा विक्रम तत्कालीन तरुण मंडळीनीच करावा असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. या काळानंतर अगदी आजपर्यंत टिळक आळी गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांची अशी काही अभूतपूर्व साखळी निर्माण झाली. काळानुरूप गणेशोत्सवाचे स्वरूप सतत बदलत राहिले हे लक्षात घेण्यासारखे आहे. या उत्सवासाठी महिलांचे सहकार्य तर सतत उल्लेखनीय.
कालानुरूप त्या काळामध्ये तयार लाकडी मखर असे. ते फक्त जोडायचे आणि त्याला रंगीत कागद आणि सोनेरी कागदाची फुले लावून सुशोभित करायचे आणि देवळाच्या खांबाला सुरमाडाच्या शोभिवंत फांद्या बांधावयाच्या एवढाच कारभार. तो ही गणपतीच्या आगमनाच्या आधीच्या दिवशी रात्री. काम थोडे असले तरी संपूर्ण रात्र जागवायचीच. अगदीच वेळ उरला तर दोन टीम करून देवळातच हतूतूचा खेळही रंगत असे.
रंगमच बांधावयाची रात्र हाही एक विलक्षण अनुभव असायचा. १०-१२ लाकडी ठोंबे पुरायचे. मधे मधे चिऱ्यावर चिरा रचून आधाराला तात्पुरते खांब आणि मग आयत्यावेळी धावपळ कारून गिरणवाल्याकडे फळ्या मागायच्या. त्यांचेही मनःपूर्वक सहकार्य असायचे हे विशेष. बैल दिवसभर थकलेले असत त्यांना काम न देता जोशांची बैलगाडी आणून त्यात फळ्या भरायच्या आणि स्वतःच बैलांच्या ठिकाणी उभे राहून गाड्या अहमहमिकेने स्पर्धा लावून पळवत आणायच्या, हा एक छंदच कार्यकर्त्यांना त्यावेळी होता. त्यात कोणालाही कमीपणा वाटत नसे हे विशेष. फळ्या टाकून होतात तोपर्यंत छपराची आठवण व्हायची, मग कोणीतरी ट्रक काढायचा त्यात आम्ही फिरायला मिळते म्हणून बसायचो. कोणत्यातरी शासकीय कार्यालयातून ताडपत्री आणण्यात यायची. हे होईपर्यंत रात्रीचे १-२ सहज वाजायचे, त्याच्यापुढे चिवे बांधून ताडपत्री बांधली की पहाटेपर्यंत स्टेज तयार. मग स्टेजवरील अंतर्गत सजावट नेपथ्यकार आणि मेकअप मॅन सदानंद मुळ्येंच्या देखरेखीखाली सायंकाळपर्यंत पूर्ण होत असे व स्टेज खऱ्या अर्थाने वापरण्यास सज्ज होत असे. एकत्रित कामाचा आणि त्याच्या सफलतेचा इतका परिपूर्ण आनंद आम्हाला उपभोगता आला याचा आनंद वाटतो.
''श्री''ची आगमन आणि विसर्जन मिरवणूक हा तर टिळक आळी गणेशोत्सवाचा प्राण आहे. वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने लेझिम-ताशे-मृदुंग, भजन यांच्या जल्लोषात या उत्सवाची मिरवणूक निघते आणि संपूर्ण शहर या मिरवणुकीचा अनुभव घेण्यासाठी प्रचंड उत्सुकतेने वाट पाहत असते याचा खास अभिमान आपल्या सर्वांनाच आजही वाटतो, स्वयंअनुशासित अशा या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे असंख्य नागरिकांकडून नेहमी आमच्यापैकी काही तरुण मंडळींना ढोल ताश्यांचे आकर्षण निर्माण झाले होते. तसा प्रयोगही करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर केला पण लेझीम आणि ढोल हे एकत्र नांदू शकत नाही याचा वेळीच अनुभव आल्याने वर्ष-दोन वर्षांच्या काळातच श्री गजाननाच्या कृपेने तो बदल काळच्या ओघात कधी संपून गेला आणि लेझीम ताश्यांचीच परंपरा अधिक तेजस्वी झाली. ही आनंदाची गोष्ट आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मात्र कालानुरूप बदल होत गेला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यानंतर हळूहळू महिलांचा सहभाग वाढू लागला. माझे आठवणीप्रमाणे टिळक आळीतील नंदिनी जोशी, त्यांची सहकारी विजूताई जोशी यांनी सर्वप्रथम सामूहिक कोळी नृत्य सादर केले आणि प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली. त्यांच्याबरोबर टिळक आळीतील तरूण मुलींनीही कार्यक्रम सादर केले होते. आज मुलामुलींना रंगमंचाची भीती अजिबात वाटत नाही. पण त्याकाळी असे नृत्य सादर करणे नक्कीच धाडसाचे होते. अनेकांनी अनेक कार्यक्रम सादर केले. एकपात्री कार्यक्रमात ठसा उमटविला ‘दाणी बंधूनी सुमारे ३५ वर्षापूर्वी अनेक एकपात्री कार्यक्रम सादर केले हे विशेष.
एरवी कोणाच्या आल्यागेल्यात फारसे नसणारे दिनकर मुसळे यांनी त्याकाळात बसविलेली दोन ते तीन नाटके ‘सबकुछ दिनू मुसळे’ अशीच होती. वृत्तपत्रात वाचलेल्या घटनांवर आधारित त्यांनी स्वत:च नाटके लिहिली. आणि मी, विलास कुलकर्णी, विशेष म्हणजे पारावरच नाटकात पदार्पण करणारे न्यायाधीशाच्या भूमिकेतील नंदू परांजपे, रानडे या सर्व कार्यकर्त्याकडून सादर करुन प्रेक्षकांची वाहव्वा मिळविली ही आठवण कायम आहे. सध्या विविध कार्यक्रमांचा सहभाग एवढा वाढला की आता सांस्कृतिक कार्यक्रमांना वेळ नेमून देणेही मंडळाला अवघड होत गेले.
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे जरी खरे असले तरी टिळक आळी गणेशोत्सव हा धार्मिक परंपरांची जपणूक, त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन, विधायक कार्य, सामाजिक बांधिलकीचे कार्य आणि त्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची मौजमजा अशाच परंपरेने संपन्न होत असतो याचा अभिमान वाटतो.
हा गणेशोत्सव म्हणजे एक विद्यापीठच आहे. या उत्सवातच निःस्वार्थीपणे, सेवाभावी वृत्तीने सार्वजनिक कामे कशी चोख व व्यवस्थित केली पाहिजेत याच्या प्रात्यक्षिकांचे धडेच तरुणांना मिळतात. सार्वजनिक जीवनात सर्व समाजाला एकत्र, बरोबर घेऊन जाण्याची कलाही इथेच शिकायला, अनुभवायला मिळते. या गणेशोत्सवामध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या भावी आयुष्यामध्ये नामवंत डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, नामवंत वक्ते, नामवंत संस्था चालक, स्वच्छ समाजकारणी आदर्श नेते असे तयार झाले आहेत. धार्मिक परंपरांची जपणूक, सामाजिक प्रबोधन, अन्य विधायक कार्य, सामाजिक बांधिलकीचे कार्य आणि त्याबरोबरच उत्सवातील सांस्कृतिक मौजमजा असे आपल्या उत्सवाचे स्वरूप असणे ही आपल्या नागरिकांच्या एकमेकांमधील सामाजिक प्रेमसंबंध अधिक आपुलकीचे व घट्ट होण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे हेच सूत्र लक्षात घेऊन टिळक आळी गणेशोत्सवाची वाटचाल चालू आहे आणि यापुढेही ती याच सामाजिक जाणिवेतून अखंडीतपणे चालू राहील असा विश्वास सर्वच कार्यकर्त्यांना आहे.

चौकट
तीन पिढ्या सध्या सजावटीत मग्न
बदलत्या काळानुसार अनेक नवनवीन कार्यकर्ते जबाबदारी घेऊ लागले, उत्सवाचे स्वरूप परंपरा कायम ठेवून बदलू लागले. खर्चही वाढू लागला, उत्सवासाठी स्वतःचे काही साहित्य असावे अशी गरज निर्माण झाली. आम्ही कार्यकर्त्यांनी एकत्र बसून या कायमस्वरूपी गुंतवणुकीसाठी वार्षिक कमीत कमी काही रक्कम सर्व कमावत्या व्यक्तींनी द्यायची अशी योजना पुढे आली व ती प्रत्यक्षात साकारही होऊ लागली. गणेशोत्सवाची मूळ संस्था मारुती गणपती पिंपळपार देवस्थान नोंदणीकृत झाली आणि गणेशोत्सवास पाठबळ मिळाले. कायमस्वरूपी गुंतवणुकीतून लेझीम, टाळ, अन्य स्टेजसाठीच्या वस्तूंची खरेदी झाली. मखराचे नावीन्यपूर्ण सजावटीची कल्पना याच काळात पुढे आली. पुढच्या पिढीने सातत्याने नवनवीन देखावे आणि सजावटींच्या माध्यमातून सार्वजनिक उत्सवाच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि विविध बक्षिसे मिळवून टिळकआळी गणेशोत्सवाचे नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उंचावर नेऊन ठेवले. विशेष म्हणजे आजही शताब्दीच्या निमित्ताने ही सर्व मंडळी आपले वय विसरून वैशिष्ट्यपूर्ण सजावटीची नवीन कल्पना निर्माण करण्यात अगदी मे महिन्यापासून कार्यरत आहेत.
---
चौकट
भाल्या काका कायम रखवालदारासारखे
गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे आरत्या, रात्री कार्यक्रम, मग हुतूतू‌चा खेळ वगैरे.. विविध करमणुकींच्या कार्यक्रमांची आजच्यासारखी त्यावेळी रेलचेल नसायची. एकतर तितकी सामाजिक जागृती आणि स्वतंत्रता नव्हती आणि चक्री भजन, खेळ यांचे आकर्षण जास्त असायचे. फारतर नाट्यछटा. एखाद्या मित्रमंडळाची छोटीशी नाटिका कार्यक्रमात असायची. बाकी काळ विविध गुणदर्शन यानिमित्ताने आणखी एका व्यक्तीची आठवण होते. ते म्हणजे (कै.) भाल्याकाका काळे. आमच्या आठवणीमध्ये पारावरचा गणेशोत्सव आला की महाराष्ट्र वॉच कंपनीचे ठोक्याचे घड्याळ पारावरच्या भिंतीवर लटकायचे. त्याकाळी संपूर्ण लाऊडस्पीकरची साधने पहिल्या दिवसापासून पारावर दाखल करून स्वत: हजर राहणारी व्यक्ती म्हणजे भाल्याकाका काळे. पारावर कोणीही नसले तरी भाल्या काळे कायम रखवालदारासारखे हजर असायचे. त्याकाळामध्ये लाऊडस्पीकर आजसारखे अद्ययावत नव्हते. जेव्हा कुरकुर होई तेव्हा लोक गोंधळ करत पण कोणताही त्रास करून न घेता भाल्याकाका आवाज सुधारण्याचा प्रयत्न शांतपणे करीत. हा त्यांचा विशेष स्वभाव होता. दर्शनासाठी येणारा कोणीही भाविक भाल्याकाकाला हाक मारल्याशिवाय जात नसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga Crime : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडली; नाईचाकूर शाखेतून चोरट्यांनी केले १९ लाख लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा फोन केला, पण मोदींनी दिला नकार; जर्मनीच्या वृत्तपत्राचा दावा

Shri Barabhai Ganpati : पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक! श्री बाराभाई गणपती; १३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू

Wall Collapse : मिरजेत भिंतीचे बांधकाम कोसळून कामगाराचा मृत्यू; सहा जण जखमी

Latest Maharashtra News Updates: मुंबईत लवकरच सुरू होणार बाईक-टॅक्सी सेवा

SCROLL FOR NEXT