swt262.jpg
87203
कुडाळ ः बाजारपेठ गणेशभक्तांनी फुलून गेली होती.
swt261.jpg
87202
कुडाळ ः लक्षवेधी गणेशहारांनी दुकाने सजली आहेत. (छायाचित्रे ः अजय सावंत)
कुडाळात बाप्पाच्या स्वागतासाठी सज्जता
बाजारपेठ गजबजलीः आजपासून घुमणार भजन, आरत्यांचे सुर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः कोकणवासीयांचे आराध्य दैवत श्री गणरायाचे आगमन उद्या (ता. २७) होत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. वाढत्या महागाईचे सावट असताना सुद्धा बाप्पाचा हा सोहळा भक्तिमय वातावरणात दिमाखात साजरा करण्यासाठी गावागावात प्रत्येक जण सज्ज झाला आहे. कुडाळ शहरात आज खरेदीसाठी गणेशभक्तांची एकच गर्दी झाली होती. विविध इलेक्ट्रिक साहित्य, लक्षवेधी फुले, आकर्षक मखरे आदी साहित्याने शहर सजले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी लागणाऱ्या साहित्याबरोबरच सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या आहेत. किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे; मात्र यंदाही गणेशोत्सवावर महागाईचे सावट आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वच प्रकारच्या साहित्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेले चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. कोकणचे आराध्य दैवत श्री गणरायाचे आगमन उद्या होत आहे. एसटी विभाग, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपापल्या स्तरावर सज्ज झाली आहे. एकूणच विविध वस्तू, फटाके आदी साहित्यांनी बाजारपेठा फुलून गेल्याने एक मंगलमय चित्र बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे. मुंबईकर चाकरमानी सुध्दा मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत.
रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांची गर्दी उसळली आहे. यावर्षी चाकरमान्यांसाठी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी मोफत शिवसेना एक्स्प्रेस सोडली आहे. त्यांनी दिलेल्या या सेवेबद्दल चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. चाकरमान्यांमुळे रिक्षा व्यवसायिकांना सुध्दा सुगीचे दिवस आले असल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत आहे.
बाजारपेठांमध्ये सजावट, रंगरंगोटी, विद्युत उपकरणे, पूजा साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदीमुळे तालुक्यातील दुकाने इको-फ्रेंडली साहित्याने (कागदी मखर, फुलांचे व कापडी मखर, लाकडाचे मखर, साईन बोर्ड) सजली आहेत. या सर्व वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
गणेशोत्सवात कायदा, सुव्यवस्था सुरळीत राहावी तसेच नागरिकांसह वाहनधारकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. कुडाळ आगाराने मुंबईतून चाकरमानी गावी घेऊन येण्यासाठी मोठ्या संख्येने एसटी गाड्या पाठविल्या आहेत. उद्यापासून भजनी मंडळांची भजने, आरत्यांनी परिसर मंगलमय होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.