कोकण

शिकाऊ डॉक्टरांची नियुक्ती म्हणजे केवळ दिखाऊपणा

CD

swt2611.jpg
87211
परशुराम उपरकर

शिकाऊ डॉक्टरांची नियुक्ती
म्हणजे केवळ दिखाऊपणा
परशुराम उपरकरः विविध प्रश्नांवरुन सत्ताधाऱ्यांवर टिका
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ः जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून ८७ डॉक्टर नियुक्त झाले. मात्र, हे सर्व डॉक्टर शिकाऊ असून ते केवळ शासकीय सेवेचा बॉंड पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हा केवळ दिखाऊपण असून अशा डॉक्टरांचा सिंधुदुर्गवासीयांना नेमका काय उपयोग? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी मुंबई–विजयदुर्ग जल-रोरो सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार असल्याची घोषणा झाल्याची आठवण करून देत या सेवचे घोडे नेमके कुठे अडकले? तसेच मुंबई–चिपी विमानसेवा पूर्ववत का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मुंबई–गोवा महामार्गासह ग्रामीण भागातील खड्डे २५ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. पण, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे यंदा चाकरमान्यांना आणि स्थानिकांना गणेशोत्सवाचे स्वागत खड्ड्यांतून करावे लागणार आहे, हीच सिंधुदुर्गवासीयांची शोकांतिका असल्याचे उपरकर म्हणाले.
आरोग्य व्यवस्थेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधून रुग्णांना रोजच गोवा-बांबोळी येथील जीएमसीत रेफर केले जात आहे. स्थानिकांना प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने ८७ डॉक्टरांची नेमणूक ही केवळ दिखाऊ ठरत आहे. या गंभीर परिस्थितीसाठी महायुती सरकार आणि पालकमंत्री जबाबदार आहेत." याशिवाय, मुंबई–गोवा महामार्गाच्या देखभालीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असताना रत्नागिरी–सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे गेल्या काही महिन्यांपासून गायब असल्याची टीका त्यांनी केली. महामार्गावरील खड्डे, आरोग्यव्यवस्थेचे बिघडलेले आरोग्य, योजनांचे बंद झालेले निधी या साऱ्याबाबत सरकार व पालकमंत्री अपयशी ठरल्याचे उपरकर म्हणाले. सिंधुदुर्गवासीयांनी आगामी निवडणुकांत महायुती सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT