कोकण

खेर्डीच्या विघ्नहर्ता मंडळाची मिरवणूक

CD

-ratchl२६४.jpg ः
२५N८७२४४
चिपळूण ः खेर्डीच्या विघ्नहर्ता मंडळाने काढलेली मिरवणूक.
---
खेर्डीच्या विघ्नहर्ता मंडळाची मिरवणूक
४२ वर्षांची जपली परंपरा ; ढोलताश्यांचा गजर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः तालुक्यातील खेर्डी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विघ्नहर्त्याच्या ४२व्या वर्षीच्या आगमन मिरवणुकीने चिपळूण शहरात उत्साह संचारला. रस्त्यांवर उसळलेली भक्तांची गर्दी, ढोलताश्यांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि गणेशभक्तीच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले चिपळूणमधील रीलस्टार्स व कन्टेंट क्रिएटर्स यांची उपस्थिती. त्यांनी टिपलेल्या क्षणांमुळे खेर्डीचा विघ्नहर्ता सोशल मीडियावर ट्रेन्डिंग ठरला आहे. यंदा मंडळाने आयोजित केलेल्या फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी स्पर्धेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला विशेष वाव मिळाला. मिरवणुकीदरम्यान शिस्तबद्धतेचा आदर्श ठेवत सर्व मंडळांनी पारंपरिक ढोलताशे, वेशभूषा व भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात विघ्नहर्त्याचं स्वागत केलं. यावर्षी मंडळाने ‘परंपरेला नवसंजीवनी’ हा संदेश देत जुन्या पद्धतींचं जतन करत नव्या पिढीला उत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न केला. चिपळूणकरांनी या उपक्रमाला दाद दिली. खेर्डीच्या विघ्नहर्ता मंडळाची मिरवणूक ही केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून, चिपळूणच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक बनली असल्याचं या सोहळ्यातून अधोरेखित झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga Crime : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडली; नाईचाकूर शाखेतून चोरट्यांनी केले १९ लाख लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा फोन केला, पण मोदींनी दिला नकार; जर्मनीच्या वृत्तपत्राचा दावा

Shri Barabhai Ganpati : पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक! श्री बाराभाई गणपती; १३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू

Wall Collapse : मिरजेत भिंतीचे बांधकाम कोसळून कामगाराचा मृत्यू; सहा जण जखमी

Latest Maharashtra News Updates: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! गणरायाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे पोहोचणार राज ठाकरेंच्या घरी

SCROLL FOR NEXT