गणेशोत्सव विशेष---लोगो
-rat२६p१४.jpg -
२५N८७१९०
राजापूर ः कोतापूर येथील मंदिरातील श्रीदेव सिद्धीविनायक.
-rat२६p१५.jpg ः
२५N८७१९१
त्रिविक्रम (श्रीदेव गणपतीचा अंश)
-rat२६p१६.jpg ः
२५N८७१९२
श्रीदेव सिद्धिविनायक मंदिर
------
नर्मदेच्या प्रवाळातून साकारलेले प्राचिन ‘सिद्धिविनायक’
कोतापूरमध्ये मंदिर; नवसाला पावणारा गणपती, बडोद्याच्या राजदरबाराशी नाते
राजेंद्र बाईत ; सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २६ ः कोकणच्या शेकडो वर्षाच्या गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा तालुक्यातील कोतापूर गावाला लाभलेला आहे. येथील श्रीदेव सिद्धिविनायक मंदिरामध्ये गुजरात येथून वाहणाऱ्या नर्मदा नदीच्या प्रवाळापासून बनवण्यात आलेली उजव्या सोंडेची वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती तब्बल सव्वादोनशे (शके १७८५) वर्षाहून अधिक वर्षापूर्वी प्रतिष्ठापित करण्यात आली आहे.
बडोदा संस्थानचे संस्थानिक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी मुनीमजी असलेले गोपाळराव रामराम जांभेकर उर्फ महिराळ यांनी धोपेश्वर येथील हरी केशव पळसुलेदेसाई यांच्या सांगण्यावरून ही श्रीदेव गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. स्वप्नदृष्टांतानुसार, महिराळ यांनी प्रतिष्ठापित केलेल्या २१ गणेशमूर्तींपैकी कोतापूरची एक गणेशमूर्ती असून, अशाच प्रकारची हुबेहूब गणेशमूर्ती बडोदा येथे आजही असल्याची माहिती श्रीदेव सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त रवींद्र उर्फ विजय प्रभुघाटे यांनी दिली.
सुमारे सात गुंठे जागेमध्ये कौलारू छप्पर आणि लाकडी खांब असलेली मंदिराची ३५ बाय ७० फूट आकाराची आकर्षक इमारत आहे. जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा मुख्य गाभारा आणि समोर सभामंडप अशी रचना आहे. इमारतीच्या दर्शनी भागामध्ये जांभ्या दगडामध्ये कोरलेली आकर्षक दीपमाळही दिसते. सिद्धिविनायकाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यापूर्वी ही इमारत साध्या पद्धतीची होती. त्या वेळी मंदिरामध्ये असलेले ‘त्रिविक्रम’ (श्रीदेव गणपतीचा अंश) होते. ते काढून त्या ठिकाणी महिराळ यांनी नर्मदानदीच्या प्रवाळापासून बनवण्यात आलेली श्रीदेव सिद्धिविनायकची मूर्ती बाळाजी गोपाळ प्रभुघाटे यांच्या कारकिर्दीत हरी बल्लाळ प्रभुघाटे यांनी प्रतिष्ठापित केल्याची माहिती विश्वस्त प्रभुघाटे यांनी दिली. चार-साडेचार फूट उंचीची बैठ्या पद्धतीची उजव्या सोंडेची ही आकर्षक रंगाची गणेशमूर्ती आहे. मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थी, अंगारकीसह श्री सत्यविनायक पूजा, गणेशयाग आदी कार्यक्रमही होतात. माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशजयंती दिवशी गणेशजन्म सोहळा, श्री गणेशजन्म कथेवर आधारित कीर्तन होते. मंदिरामध्ये श्रीदेव सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापित मूर्ती ‘बाळगणेश’ या नावानेही प्रसिद्ध असून, श्रीदेव सिद्धिविनायकाच्या दर्शनासह उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटक राज्यातीलही गणेशभक्त मोठ्या संख्येने येतात.
चौकट ः १
नवसाला पावणारा
नवसाला पावणारा श्रीदेव सिद्धिविनायक म्हणून कोतापूरच्या सिद्धिविनायकाची ख्याती आहे. विविध नवसांनाही पावत श्री सिद्धिविनायकाकडून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याची माहिती रवींद्र प्रभुघाटे यांनी दिली.
चौकट ः २
तीन वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती
सिद्धिविनायक मंदिरामध्ये तीन गणेशमूर्ती आहेत. त्यापैकी नर्मदानदीच्या प्रवाळापासून बनवलेली गणेशमूर्ती मंदिरामध्ये प्रतिष्ठापित असून, दुसरी लाकडी गणेशमूर्ती उत्सवावेळी मंदिराभोवती घालण्यात येणाऱ्या पालखी प्रदक्षिणेवेळी पालखीमध्ये ठेवण्यात येते. तिसरी चिनीमातीची छोटी गणेशमूर्ती असून, ती गणेशजन्म सोहळ्यावेळी पाळण्यात ठेवली जाते. गणेशोत्सव काळात बुधवारी (ता. २७) सकाळी षोड्शोपचार पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर आरती आणि भजन असे कार्यक्रम उत्सवकाळात होणार आहेत.
---
दृष्टिक्षेपात...
* सव्वादोनशे वर्षांपूर्वीची प्रतिष्ठापना
* उजव्या सोंडेची दुर्मिळ
* नवसाला पावणारा ‘बाळगणेश’ मूर्ती
* महाराष्ट्र-कर्नाटकातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी
* स्वप्नदृष्टांतातून मूर्तीची स्थापना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.