कोकण

मालवण बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली

CD

87310

मालवण बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली
खरेदीचा उत्साहः पावसाच्या उघडीपीने गणेशभक्तांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : विघ्नहर्ता गणरायाचे आगमन उद्या (ता. २७) होत असून मालवण शहर व तालुका गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून, तो कोकणी माणसासाठी आस्थेचे प्रतीक आहे. बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनात गणेशाचे एक खास स्थान आहे. उद्या तालुक्यात ३ सार्वजनिक आणि ६,९३१ घरगुती गणपतींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे.
गणेशोत्सव जवळ आला की, कोकणी माणसाच्या मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू होते आणि बाजारपेठा गजबजून जातात. यंदाही गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. आज सकाळपासूनच बाप्पाच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य, विविध प्रकारचे फुलांचे हार आणि ताजी फळे यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. ग्राहकही उत्साहाने खरेदी करताना दिसत होते.
सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी आलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला; मात्र साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची काही प्रमाणात धांदल उडाली. पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने खरेदीचा उत्साह कायम राहिला.
यावर्षीच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असले तरी, कोकणी माणूस मागे हटायला तयार नाही. ‘ऋण काढून सण साजरा करणारा’ अशी कोकणी माणसाची ओळख आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी खर्च करताना तो कधीच हात आखडता घेत नाही. आपले घर, वाडी आणि बाप्पाची मूर्ती सजवण्यासाठी तो कोणताही विचार न करता खरेदी करताना दिसत आहे. शहरातील बाजारपेठ आकर्षक मखर, विद्युत रोषणाईची तोरणे आणि फुलांच्या माळांनी सजली आहे.
या सजावटीमुळे बाजारपेठेला एक वेगळीच शोभा आली आहे. यावर्षीचा गणेशोत्सव कोकणी माणसाच्या असीम श्रद्धेचे आणि उत्साहाचे प्रतीक म्हणून साजरा होत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण तालुका आतुर झाला आहे आणि हीच आतुरता बाजारपेठेतील गर्दीतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या गावी, म्हणजे तालुक्यात दाखल झाले आहेत. आज अनेक चाकरमानी बाजारपेठेत गणेश सजावटीचे साहित्य, फळे आणि भाज्या खरेदी करताना दिसून आले. बाजारपेठेतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT