swt272.jpg
87452
खारेपाटणः सभेत बोलताना अध्यक्ष रवींद्र जठार. बाजूला सुरेंद्र कोरगावकर, एकनाथ कोकाटे व संचालक.
खारेपाटण सोसायटीची वाटचाल अभिमानास्पद
रवींद्र जठारः वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २७ : खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थेला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी ग्रामीण भागातील ही महत्त्वाची शेतकरी संस्था असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे उद्गार संस्थेचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काढले.
खारेपाटण सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या वार्षिक सभेला उपाध्यक्ष एकनाथ कोकाटे, संचालक सुरेंद्र कोरगावकर, विजय देसाई, इस्माईल मुकादम, श्रीधर गुरव, तृप्ती माळवदे, उज्ज्वला चिके, मंगेश गुरव, रघुनाथ राणे, अशोक पाटील, मोहन पगारे, रवींद्र शेट्ये, संदेश धुमाळे, संस्थेचे कार्यालक्षी संचालक व सचिव अतुल कर्ले यांसह खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत, भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालक संतोष पाटणकर, नंदकिशोर कोरगावकर, संस्थेचे सचिव शुभम मोरे, ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई, खारेपाटण रोटरी क्लबचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, महिला बचतगटाच्या कार्यकर्त्या गौरी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्त संस्थेच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कुणकवण येथील प्रगतशील शेतकरी आणि संस्थेचे सभासद जितेंद्र कदम यांची आदर्श शेतकरी म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी आपल्या दिवंगत पत्नीचे अवयव दान करून समाजाला एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल त्यांचा अध्यक्ष जठार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव कारण्यात आला.
अतुल कर्ले यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्ष जठार यांनी, सभासदांच्या पाठिंब्यावरच संस्थेने आजपर्यंत प्रगती केलेली आहे. पुढील काळात बचतगटाच्या महिला कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येतील, असे सांगितले. सूत्रसंचालन एकनाथ कोकाटे यांनी केले. आभार विजय देसाई यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.