swt278.jpg
87458
दोडामार्गः रानभाजी महोत्सवात विविध रानभाज्यांचे प्रकार पाहताना प्रमुख पाहुणे.
रानभाज्यांचे महत्त्व सर्वदूर पोहोचवा
प्रज्ञा राजमानेः दोडामार्ग तहसीलमध्ये महोत्सवास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २७ : रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. रानभाजीचे महत्त्व जाणून घ्या आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, असे प्रतिपादन प्रभारी तसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी केले.
कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर फळबाग अध्यक्ष संजय देसाई, आत्मा समिती सदस्य राकेश धरणे, विनिता देसाई, चेतना गडेकर, प्रमुख मार्गदर्शक राजेश शोँगारे, चंद्रशेखर सावंत, लवू परब, सुमित दळवी, तुळशीदास नाईक, शिरीष नाईक, तालुक्यातील शेतकरी, कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक राजेश शोँगारे यांनी, जो दगडातले खातो, तो दगडासारखा असतो, असे सांगत रानभाज्यांविषयी माहिती दिली. प्रत्येक फळ, फुल, भाजी यांचे आपल्या आरोग्याशी काय महत्त्व आहे, हे त्यांनी पटवून दिले. तसेच बाजारी भाजीपेक्षा अथवा फास्टफूडपेक्षा रानभाजी आपल्या आरोग्याला महत्त्वाची कशी आहे हे उदाहरणांसहित समजावून सांगितले. आपले आरोग्य जपायचे असेल, तर रानभाजी खा, असे आवाहनही केले. शेतकरी चंद्रशेखर सावंत यांनी, माणसापेक्षा प्राणी हुशार आहेत. हे प्राणी आपली प्रकृती बिघडली की चार, दुर्वा आदी वनस्पती खातात. तसेच आपले आयुष्य निरोगी जगण्यासाठी रानभाज्यांचे सेवन आवश्यक आहे, असे सांगितले.
गणपती सणाला काजू मोदक, आंबा मोदक आपण बाजारपेठेत बघतो; पण यावर्षीपासून तायकाळा भाजीसह इतर रानभाज्यांचे पदार्थ आणि मोदक गणपती उत्सवात बाजारपेठेत येणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी खरेदीमध्ये या पदार्थांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.