कोकण

स्पर्धा परीक्षा देवून युवा प्रशिक्षणार्थिंनी शासनात यावे

CD

- rat२९p५.jpg-
२५N८७८६६
रत्नागिरी ः समाजकल्याण कार्यालयात अकरा महिने काम केलेल्या युवा प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्र देताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते.

स्पर्धा परीक्षेतून प्रशिक्षणार्थींनी शासनात यावे
प्रशांत सातपुते ः युवा प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून साहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात केलेल्या कामामुळे निश्चितच लाभार्थ्यांना फायदा झाला असेल. त्यांच्या समाधानाची, आशीर्वादाची, पुण्याईची शिदोरी जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षा देऊन युवा प्रशिक्षणार्थींनी शासनामध्ये यावे. शंभर दिवस उपक्रमात साहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाने केलेल्या कामगिरीबद्दल जिल्ह्याला मान मिळाला आहे. तो त्यांनी कायमस्वरूपी टिकवून ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
समाजकल्याण कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील कार्यालयात अकरा महिने काम केलेल्या युवा प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्र देऊन निरोप देण्यात आला. या वेळी साहाय्यक आयुक्त दीपक घाटे, गृहपाल रवींद्र कुमठेकर, प्राची विचारे, तालुका समन्वयक अमोल पाटील, गजानन जळके, उमेश अष्टुरे आदी उपस्थित होते. तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनाही प्रशस्तिपत्र देण्यात आले.
या प्रसंगी घाटे म्हणाले, युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी या विभागात उत्तम काम केले आहे. इथला अनुभव त्यांना निश्चितच जीवनात उपयोगी ठरेल. तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना या ज्येष्ठांसाठीच्या योजनेमध्ये त्यांचे सहाकार्य, योगदान उल्लेखनीय राहिले आहे. चांगला अभ्यास करून स्पर्धा परीक्षा द्यावी आणि शासनामध्ये कायमस्वरूपी यावे. नीटनेटकेपणा, स्वच्छता हा केवळ शंभर दिवस शासनाचा उपक्रम न राहता सर्वांनी त्यामध्ये सातत्य ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : 'मोहम्मद शमी दर्जेदार गोलंदाज, पण...'; IND vs SA कसोटी मालिकेतून वगळण्यावर कर्णधार गिलचे स्पष्टीकरण

Pune University : पुणे विद्यापीठाच्या मुद्रणालयाचा अमृतमहोत्सव! लवकरच येणार 'डिजिटल प्रिंटर'; कृष्णधवलऐवजी रंगीत छपाईची सेवा

आनंदाची बातमी! 'बांधांवरून होणारे वाद मिटणार'; कुटुंबातील पोटहिश्‍श्‍याची मोजणीबाबत महसूल, वन विभागाचा माेठी निर्णय..

Latest Marathi Breaking News Live : मुंबईत सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात कडक कारवाई; एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम

Nagpur Dangerous Electric Poles: महावितरणने घेतला विद्युत खांबांचा आढावा; ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची तत्‍काळ घेतली दखल

SCROLL FOR NEXT