कोकण

सेंद्रीय शेती

CD

-rat२८p१९.jpg-
P२५N८७७२६
विद्यार्थ्यांनी पिकवलेली रताळी.
-----------
काही सुखद---लोगो

ताम्हाणे शाळेत सेंद्रिय शेतीचा प्रयोग
५० गुंठे जमिनीवर बहुपिकीय शेती; माकडांचा त्रास रोखण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे येथील जिल्हा परिषद शाळेने परिसरातील तब्बल ५० गुंठे जमिनीवर बहुपीक सेंद्रिय शेती फुलवली आहे. माकडांचा त्रास टाळण्यासाठी कंदवर्गीय आणि मसालावर्गीय पिकांना प्राधान्य दिले आहे. शाळेने गेल्या वर्षी सुमारे ४० किलो रताळ्याचे उत्पादन घेतले होते. या सेंद्रिय शेती प्रकल्पात मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा सक्रिय सहभाग लाभला आहे. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुरता न राहता स्थानिकांसाठीही एक प्रेरणादायी आणि शाश्वत शेतीचे उदाहरण ठरला आहे.
देवरूखजवळ वसलेल्या ताम्हाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिलशेठ गायकर यांची दूरदृष्टी, मुख्याध्यापिका तनुजा पवार यांचे नेतृत्व, सहशिक्षिका सुलेखा जाधव यांचे योगदान आणि पहिली ते चौथीमधील केवळ १९ विद्यार्थ्यांची (१० मुलगे व ९ मुली) मेहनत यामधून ५० गुंठ्यांवर सेंद्रिय शेती फुलवण्यात यश आले आहे. यामध्ये ग्रामस्थ व पालकांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
या शाळेने शाश्वत अन्नप्रणाली या थीमअंतर्गत परसबाग फुलवली आहे. त्यात कंदवर्गीय, मसाला, तृणधान्य, रानभाजी, वेलवर्गीय, भाजीपाला, फळे, फुले, औषधी, वनशेती, हिरवळी आणि चारापिके घेतली आहेत. कोकणात माकडांच्या उपद्रवामुळे शेती सोडणाऱ्यांचे मोठे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यात विशेष म्हणजे, येथे घेतलेली पिके माकडांचा त्रास होत नाहीत, अशी अभ्यासपूर्वक निवडलेली आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान टळते आणि उत्पादनाचा दर्जा कायम राहतो. तसेच कंदवर्गीय पिकांकडे माकडं फिरकत नाहीत. त्यामुळे सुरण, रताळी, घोरकंद, करंदी, कणगर, मिश्रिकंद आदी पिके त्यांनी घेतली आहेत तसेच मसाला वेलची, दालचिनी, तमालपत्र, ऑलस्पाइस, लवंग, हळद, आले, कडीपत्ता, काळीमिरीचीही लागवड केली आहे. अळू, भारंगी, दिंडा, अबईसारख्या रानभाज्यांचे संवर्धन करण्यावर भर दिला आहे.
---
कोट
हा प्रकल्प म्हणजे फक्त शेती नाही तर मुलांच्या सर्वांगीण शिक्षणाचा भाग आहे. आम्ही पिकांची लागवड, संगोपन, संरक्षण, काढणी, विक्री अशा संपूर्ण प्रक्रियेत मुलांचा सहभाग घेतो. यातून त्यांना श्रमाची किंमत, निसर्गाची महत्ता आणि स्वावलंबनाचा मार्ग समजतो. ताम्हाणे शाळा म्हणजे आज केवळ शिक्षणसंस्था नाही तर एक लहान कृषीविद्यापीठ आहे. यातून भविष्यात आदर्श शेतकरी घडावा, अशी आशा आहे.
- तनुजा पवार, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT