कोकण

६० वर्षे मूर्तीवर नाममुद्रा कांबळे पेंटर यांची

CD

टिळक आळी गणेशोत्सव शताब्दी--लोगो

-rat२९p१४.jpg-
२५N८७९६५
घनःश्याम कांबळे
-rat२९p१५.jpg-
२५N८७९७३
श्रीधर गोखले
----
साठ वर्षे मूर्तीवर नाममुद्रा कांबळे पेंटर यांची
पित्यानंतर पुत्रही ; काका गोखले यांचा ठसा दोन तपे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः टिळकआळी गणेशोत्सवातील श्रींची मूर्ती दीर्घकाळ म्हणजे ६० वर्षाहून अधिक काळ सुबक आणि प्रसन्न मूर्ती पेंटर कांबळे (कृष्णा महादेव कांबळे) आणि गेली दहा वर्षे त्यांचा मुलगा दादा कांबळे म्हणजेच घन:श्याम कृष्णा कांबळे साकारतात. २४ वर्षे मूर्ती आणि देखावे मूर्तिकार श्रीधर उर्फ काका गोखले यांनीही साकारले.
पेंटर कांबळे सुरुवातीला श्रीराम नाट्यमंदिराचे रंगमंचावर (आताचे श्रीराम थिएटर) काम करायचे. माजी विश्वस्त ग. ल. खेर सर पेंटरांच्या कारखान्यामध्ये रेखणी करत. सरांचा तो छंद होता. सरांचे मोठे भाऊ वसंत तथा नाना खेरही असेच काम करायचे, असे पेंटर दादा कांबळे यांनी त्यांच्या आठवणीमध्ये सांगितले आहे. दादा कांबळे त्यांच्या लहानपणी चित्रशाळेत वडिलांबरोबर काम करत. पूर्वी वेगवेगळ्या कॅलेंडरवरील मूर्तीचे फोटो पाहून मूर्ती हाती कराव्या लागत. आयटीआयचा सिव्हिल ड्राफ्टसमनचा कोर्स पूर्ण केलेले दादा कांबळे वडिलांच्या गणपती कारखान्यातच रमले. पारावरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती करताना कार्यकर्त्यांच्या सूचनांचे संपूर्ण समाधान करता येते आणि याचा आनंद इतर कोणत्याही मूर्ती करतांना येतो त्यापेक्षा कितीतरी अधिक असतो, असेही दादा कांबळे सांगतात.
१९८७च्या दरम्याने गणेशोत्सवामध्ये नवनवीन देखावे आणि आनुषंगिक मूर्ती श्रीधर गोखले यांनी साकारल्या. अपघातामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करत गोखलेकाकांनी टिळकआळी गणेशोत्सव मंडळाची मूर्ती काढण्याची जबाबदारी २४ वर्षे पारही पाडली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये गणेशोत्सवामधील देखावे आणि मूर्ती बक्षीसपात्र ठरल्या. त्यांच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट मूर्ती, उत्कृष्ट देखावे यांचे पुरस्कार मंडळाला मिळाले; पण ते माझे यश व्यक्तिगत यश नसून सर्व कार्यकर्त्यांचे ते यश होते, असे गोखले सांगतात. गजानन मूर्तीचा मेहनताना न घेता फक्त खर्चाची रक्कम त्यांनी स्वीकारली. श्री गजाननाने सेवा करण्याची संधी दिली म्हणून गणपती मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुकुट आणि कडे मंडळाकडे गोखले यांनी सुपूर्द केले.
--
कोट
टिळकआळी गणेशोत्सवाच्या शतक महोत्सवी वर्षाची श्रींची मूर्ती काढण्याची जबाबदारी मंडळाने आपल्या दिली आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा क्षण आहे आणि श्री गजानन कृपेने हे कार्य माझ्या हातून उत्तमप्रकारे करून घेण्याची शक्तीही श्रीने दिली.
--घन:श्याम कांबळे, मूर्तिकार

कोट
थोडा शारीरिक त्रास झाला तरी वेळोवेळी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सूचना पाळताना माझ्याकडून जणू गणरायच ते काम करून घेत असे आणि त्याचा आनंद मी कार्यकर्त्यांना देत असे, अशी माझी भावना. माझ्याकडून मदनाचा वध, गणपती शंकराच्या पिंडीवर पाणी सोडतो, असे देखावे घडले. हे कसे घडले, ते त्या श्री गजाननालाच माहित.
--श्रीधर उर्फ काका गोखले, मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT